• Sat. Sep 21st, 2024
तेलंगणात भाजपच्या सर्व जागांवरील डिपॉझिट जप्त होणार; केसीआर यांच्या कन्या के. कविता अक्कांचा दावा

सोलापूर: शहरात केसीआर यांच्या कन्या आमदार कविता अक्का आल्या होत्या. नवरात्रोत्सव काळात सोलापूर शहरातील पद्मशाली समाजात ब्रतुकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रविवारी दुपारी केसीआर कन्या कविता ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. माजी खासदार लिंगराज वल्याळ यांच्या घरी तेलंगणाच्या आमदार कविता आल्या होत्या. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांचा हात असल्याच्या माझ्याकडे तक्रारी; फारुख शाह यांचा गंभीर आरोप
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या १०५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तेलंगणा राज्यात बीआरएस पक्ष तगडी फाईट देईल. भाजपने लिस्ट जरी जाहीर केली तरी बीआरएस पक्षाला काहीही फरक पडणार नाही, अशी बीआरएसच्या आमदार कविता अक्का यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तेलंगाणा राज्यात के चंद्रशेखर राव गेल्या दोन टर्म तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले आहेत. बीआरएस पक्ष दक्षिण भारतात इतिहास करण्याच्या तयारीत आहे. यावेळी देखील के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री होतील आणि इतिहास घडवतील. भाजप असो किंवा काँग्रेस असो बीआरएस पक्षाला जनतेचा पाठिंबा आहे. टीव्हीवर आलेल्या ओपिनियनवर विश्वास नाही. आम्ही जनतेच्या ओपिनियन पोलवर विश्वास ठेवत आहोत, असे म्हणत कविता अक्का यांनी तेलंगाणाच्या सत्तेवर दावा ठोकला आहे.

तुळजा भवानीच्या दर्शनासाठी निघालेले भाविक अन् अन्नछत्र एक दृढ ऋणानुबंध

तेलंगणा मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या आमदार कविता अक्का सोलापूर शहरात साजरा होणाऱ्या ब्रतुकम्मा उत्सवात सहभागी झाल्या होत्या. पूर्व भागातील तेलुगु भाषिक समाजाचा आनंद उत्सव म्हणून हा पुष्पोत्सव ओळखला जातो. नवरात्र निमित्त हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तेलंगणा प्रांतातली महिला हा आनंदोत्सव पितृपक्ष अमावस्या अष्टमी पर्यंत साजरा करतात. हळदीने गौरीदेवी बनवून निसर्गातील विविध रंगी फुले आणतात. फुलांचा गोपुर बनवून पारंपरिक लोकगीते म्हणतात.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed