• Sat. Sep 21st, 2024
चारा घोटाळ्यानंतर आता अंत्यसंस्कार घोटाळा उघडकीस; नागपुरात नेमकं काय घडलं?

नागपूर: बिहार राज्यातील चारा घोटाळा हा देशातील राजकारणातील स्थितंतर म्हणून ओळखला जातो. आता जिल्ह्यात गायींच्या अंत्यसंस्काराचा घोटाळा समोर आला आहे. मृत गायींचा दफनविधी करण्यासाठी मिळणारा निधी लाटण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांनी या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले आहेत.
साखर कारखान्यांचे हिशोब तपासण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज तयार, राजू शेट्टींचे वक्तव्य
रामटेक तालुक्यात मरण पावलेल्या गायींपैकी काहींचा दफनविधी करून काहींची विल्हेवाट वेगळ्याच पद्धतीने लावण्यात आली. तरीसुद्धा त्यांच्या दफनविधीसाठीचे अनुदान लाटून यातही भ्रष्टाचार झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. मृत गाय दफन करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. प्रती गाय ३ ते ४ हजार रुपये दिला जातात. परंतु या गायी दफन न करताच त्यासाठीचे अनुदान लाटले गेले. रामटेक तालुक्यातील सिल्लारी पशुवैद्यकीय दवाखान्यात हा प्रकार झाल्याचा मुद्दा शिवसेनेचे संजय झाडे यांनी स्थायी समितीत उपस्थित केला होता. चार वर्षापूर्वी येथे १५७ गायी मरण पावल्या होत्या. या गायी दफन करण्याचे सांगून लाखो रुपयांची उचल करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात या गायी दफनच करण्यात आल्या नाही.

मला काका म्हणू नको, मनसेच्या अजित पवारांना राज ठाकरेंना सल्ला

काहीच गायी दफन करण्यात आल्या. तर उर्वरित गायींची विल्हेवाट दुसऱ्या पद्धतीने लावण्यात आली. काही गायी फेकून देण्यात आल्या, काहींच्या कातडीचा वापर करण्यात आला, असा आरोप झाडे यांनी करीत चौकशीची मागणी केली. ती कोकड्डे यांनी मान्य केली. या संपूर्ण प्रकरणाची समितीमार्फत चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, हा घोटाळा रामटेक तालुक्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्यात हा प्रकार झाल्याची चर्चा सुरू असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed