• Mon. Nov 25th, 2024

    नातेवाईकाच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात डांबलं, मग अत्याचार अन् अखेर…

    नातेवाईकाच्या मदतीने अल्पवयीन मुलीला घरात डांबलं, मग अत्याचार अन् अखेर…

    गडचिरोली: एका अल्पवयीन मुलीला एका नातेवाईकाच्या मदतीने घरात डांबून ठेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आणि दिड महिन्यापासून पोलिसांना चकमा देणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. संजू बबलू रॅाय राहणार चामोर्शी असे त्या आरोपीचे नाव आहे. त्याला या कामात मदत करणाऱ्या प्रदीप दीपक रॅाय याला आधीच अटक झाली होती. दोघांविरूद्ध चामोर्शी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

    गेल्या ५ सप्टेंबर २०२३ रोजी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या परिचयातील असलेल्या आरोपी संजू बबलु रॉय याने प्रदीप दिपक रॉय याच्या मदतीने तिला घरात बंदीस्त करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी चामोर्शी पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपी प्रदीप रॉय याला अटक केली होती. परंतु गुन्ह्याची चाहुल लागताच मुख्य आरोपी संजू रॉय हा आपल्या घरातून तसेच परिसरातून पसार झाला होता.

    सुखी संसारात अचानक भूकंप, पत्नीचा एक फोन अन् सारं संपलं, राजस्थान ते कश्मीरपर्यंत खळबळ
    सदर गुन्ह्याचे गांभीर्य बघून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश दिले. परंतू, आरोपी वारंवार परराज्यात आणि परजिल्ह्यात राहून त्याचा ठावठिकाणा बदलवित पोलिसांना चकमा देत होता. दरम्यान, गोपनीय सूत्रांकडून तो आष्टी-गोंडपिपरी मार्गावर त्याच्या नातेवाईकांना भेटण्याकरीता येणार असल्याचे समजताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडून चामोर्शी पोलिसांच्या ताब्यात दिले.

    फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

    ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed