• Mon. Nov 25th, 2024

    भविष्य निर्वाह निधी अधीक्षक ACBच्या जाळ्यात; ४० हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

    भविष्य निर्वाह निधी अधीक्षक ACBच्या जाळ्यात; ४० हजारांची लाच घेताना पकडले रंगेहाथ

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : निवृत्त मुख्याध्यापकाची अर्जित रजेची रक्कम देण्यासाठी ४० हजारांची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या (माध्यमिक) अधीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ अटक केली. एसीबीने सिव्हिल लाइन्समधील प्रशासकीय इमारतीमधील सातव्या माळ्यावरील कार्यालयात ही कारवाई केली. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

    काय आहे प्रकरण?

    प्रमोद झांगोजी सोनटक्के (वय ५३, रा. लाइफस्टाइल सोसायटी) असे अटकेतील अधीक्षकाचे नाव आहे. ६०वर्षीय तक्रारदार नंदनवमध्ये राहातो. तो सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. त्याचे अर्जित रजेच्या रोखीकरणाचे एकूण १३ लाख ३० हजार ११३ रुपयांचे बिल काही तांत्रिक त्रुटीमुळे कोषागारात मंजूर झाले नाही. रक्कम परत पाठविण्यात आली. ती मिळवण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला. हे बिल काढून देण्यासाठी सोनटक्के यांनी तक्रारदाराला ५० हजारांची लाच मागितली. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. त्यानंतर सोनटक्के यांनी त्याला ४० हजार रुपये मागितले. तक्रारदाराने एसीबीत तक्रार केली.

    अधीक्षक राहुल माकणीकर, अतिरिक्त अधीक्षक संजय पुरंदरे, अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रवीण लाकडे, त्यांचे सहकारी सारंग बालपांडे, आशू श्रीरामे, अस्मिता मेश्राम, प्रफुल्ल बांगडे, राजू जांभुळकर यांनी कार्यालयात सापळा रचला. लाच घेताच एसीबीच्या पथकाने सोनटक्के यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सोनटक्के यांच्या घराचीही झडती घेण्यात येत आहे.
    यूपीचा कुख्यात दरोडेखोर पनवेलमध्ये कॅबचालक, २३ व्या वर्षी आरोपीवर ३३ जबर गुन्हे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed