• Sat. Sep 21st, 2024

आता चालकाला झोप लागताच वाजणार बझर, चिमुरड्याने बनवला भन्नाट गॉगल, वाढत्या अपघातांना आळा बसणार

आता चालकाला झोप लागताच वाजणार बझर, चिमुरड्याने बनवला भन्नाट गॉगल, वाढत्या अपघातांना आळा बसणार

पुणे : राज्यात काही दिवसांपूर्वी नागपूर शिर्डी यांसह अनेक शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरू झाला. जेव्हापासून समृध्दी महामार्ग तयार झाला आहे, तेव्हापासून या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या अपघातांमध्ये अनेक जण मयत व जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर होणारे अपघात हे मुख्यत्वे करून रात्रीच्या वेळी चालकाचे गाडीवरून सुटलेले नियंत्रण, चालकाची झोप पूर्ण न होणे, चालकाला डुलकी लागणे या कारणामुळे झाले आहेत. या गोष्टीचा विचार करुन इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने चक्क चालकाला डुलकी लागल्यास अलर्ट देणाऱ्या गॉगलची निर्मिती केली आहे.

आयुष घोलप असे गॉगल बनवणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शेतकरी कुटुंबातील या मुलाने आगळ्यावेगळ्या गॉगल प्रयोगाची चर्चा सर्वत्र होत असून सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. रात्रीच्या वेळी लांबच्या प्रवासाला निघालेले वाहन चालक यांना डुलकी लागल्यास अपघात होतात. याच अपघातास आळा बसावा यासाठी आंबेगाव तालुक्यातील चास येथील इयत्ता ८ तील विद्यार्थ्यांने वाहन चालकाने डोळे झाकल्यास चालकाला अलर्ट करणारा सेन्सर गॉगल विकसित केला आहे.

Lalit Patil: ललित पाटील ससूनमधून पळाला, नाशिकमध्ये जाऊन FD मोडली, एक किलो सोनं विकत घेतलं: सुषमा अंधारे

अवसरी खुर्द येथील न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेणारा आयुष घोलप या विद्यार्थ्याने हा चमत्कार केला आहे. लहानपणापासूनच विज्ञानाची आवड असलेल्या हा विद्यार्थी शाळेत अतिशय हुशार व चाणाक्ष आहे. तो नेहमीच विविध प्रयोग करत असतो यावेळी त्याने शालेय विज्ञान प्रकल्प विषयात रस्त्यावरील अपघात कमी होण्यासाठी मदत करणारा गॉगल विकसित केला आहे. रात्रीच्या वेळी लांबच्या पल्यावर जाणारे सर्व अवजड वाहन चालक, ट्रॅव्हल बस, परराज्यात जाणारे ट्रक व इतर अनेक वाहन चालक या गॉगलचा वापर करू शकतात. हा गॉगल वाहन चालकाने घातल्यास व त्याला झोप येऊ लागल्यास त्याने डोळे झाकले की गॉगल चे सेन्सर ऑन होऊन चालकास अलर्ट करणारे बझर ( साऊंड ) वाजला जाईल व वाहन चालक अलर्ट होऊन वाहनावर लक्ष ठेवून व्यवस्थित वाहन चालू शकेल.

आयुष घोलप हा ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे. तो दरवर्षी विज्ञान प्रकल्पात विविध प्रयोग करत असतो. त्याने यावर्षी कमी खर्चात बनवलेला गॉगल हा आगळावेगळा गॉगल असून यामुळे हजारो वाहन चालक व प्रवाशांचे प्राण वाचणार आहे. आयुष घोलप यांच्या डोक्यात अजूनही विविध प्रयोगाबाबत विविध कल्पना आहेत. त्याचे कल्पनाना चालना मिळण्यासाठी संस्थेमार्फत व पुढील शिक्षणासाठी व सायन्समध्ये करिअर करण्यासाठी शासन स्तरावर व इतर ठिकाणी प्रयत्न करणार असल्याचे त्याच्या मार्गदर्शकांनी सांगितले आहे.

पुण्यात नेमकं चाललंय काय? पिस्तूल-तलवारीच्या धाकाने भरवस्तीत जुगारअड्डे लुटले, पुणे पोलिसांची हाताची घडी-तोंडावर बोट

गॉगल बनवण्यासाठी हे वापरले साहित्य..

आयुष घोलप या विद्यार्थ्यांनी गॉगल तयार करण्यासाठी सेन्सर, बटन, बजर, गॉगल, बॅटरी, चार्जर इत्यादी साहित्य वापरले असून यासाठी फक्त अडीचशे रुपये खर्च आला आहे. भविष्यात या गॉगलवर तज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून गॉगल विकसित करून वापरात आला तर हजारो वाहन चालकांचे व प्रवाशांचे प्राण वाचणार आहे.

पोलीस मागे लागलेल्या ट्रकने ओव्हरटेक केलं; चिमुकल्यानं अपघाताचा घटनाक्रम सांगितला

Read latest Pune news And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed