• Sat. Sep 21st, 2024

३३ वर्षांचा संघर्ष अन् अखेर आई एकवीरा देवीला मिळाले हक्काचे दागिने, तिसऱ्या माळेला देवीच्या चरणी अर्पण

३३ वर्षांचा संघर्ष अन् अखेर आई एकवीरा देवीला मिळाले हक्काचे दागिने, तिसऱ्या माळेला देवीच्या चरणी अर्पण

धुळे: धुळ्यातील बहुचर्चित जिल्हा परिषद अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून एकवीरा देवीचे दागिने जप्त करण्यात आले होते. धुळे जिल्हा १७ न्यायालयाच्या आदेशाने ३३ वर्षानंतर या दागिन्यांचा लिलाव होऊन श्री एकवीरा देवीवर रेणुका माता ट्रस्टने सर्वाधिक १६ लाख ५१,००० ची बोली लावत हे दागिने मिळविले. हे दागिने एकवीरा देवीच्या चरणी अर्पण करत आज तिसऱ्या माळेला हे दागिने श्री एकवीरा देवीला अर्पण करण्यात आले.

धुळे जिल्हा परिषदेतील संपूर्ण राज्यात गाजलेल्या अपहार कांडातील आरोपी भास्कर वाघ यांच्या घरातून श्री एकवीरा देवीचे दागिने ३३ वर्षांपूर्वी जप्त करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून हे दागिने न्यायालयाच्या ताब्यात होते. अखेर या दागिन्यांचा लिलाव करून ते देवीला अर्पण करण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर, श्री एकवीरा देवीवर रेणुका माता ट्रस्टने तब्बल १६ लाख ५१ हजारची बोली लावत ३३ वर्षाच्या संघर्षानंतर हे दागिने मिळविले.

दुर्गा देवीच्या या मंदिरात ८०० वर्षांपासून महिलांना नो एन्ट्री, कारणही आश्चर्यचकित करणारं
३३ वर्षानंतर मिळालेले दागिने आज देवीच्या या दागिन्यांची विधिवत पूजा करून तसेच मंत्र उपचाराने पूजा करून दुपारच्या महाआरती नंतर हे दागिने देवीला अर्पण करण्यात आले. यावेळी ५ जोडप्यांच्या हस्ते या दागिन्यांची पूजा करण्यात आली. यावेळी या दागिन्यांची मंदिराच्या परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.

यानंतर आई एकवीरा देवीचे हे दागिने देवीच्या गाभाऱ्यात नेल्यानंतर देवीच्या मूर्तीवरील लावण्यात आलेला गजरा आणि काही फुले खाली पडून येताच उपस्थितांनी दैवी अनुभव घेतला. दागिने देवीच्या चरणी अर्पण करतात देवीने कौल दिल्याचा अनुभव यावेळी भक्तांनी घेतल्याने अनेकांचे डोळे यावेळेस पानावल्याचे चित्र बघायला मिळाले.

नवरात्रोत्सवाचं औचित्य, अंबादास दानवे सहकुटुंब सप्तशृंगी देवी चरणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed