अमरावती: वाठोडा शुक्लेश्वर येथील महावितरण उपकेंद्रांतर्गत वाकी रायपूर (ता. भातकुली) येथील खासगी वायरमनचा ट्रान्सफॉर्मरचे काम करीत असताना मृत्यू झाला आहे. ते वीजप्रवाहाच्या संपर्कात आले होते. १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे.
दीपक दिगंबर पडवाळ (४५, रा. वाकी रायपूर) असे मृत्यू झालेल्या खासगी वायरमनचे नाव आहे. वडुरा शिवारामध्ये इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मरचे काम करीत असताना अचानक विजेचा करंट लागून त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.

दीपक पडवाळ हे १० ते १२ वर्षांपासून महावितरण कर्मचाऱ्यांच्या हाताखाली काम करीत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. घटनेची माहिती खोलापूर पोलिसांना मिळताच ठाणेदार पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, घटनास्थळ खल्लार पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने खल्लार पोलिसांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनासाठी मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.