• Fri. Nov 29th, 2024

    शाब्दिक बाचाबाची, नेता थेट रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीजवळ पण आरोप फेटाळले, नेमका प्रकार काय?

    शाब्दिक बाचाबाची, नेता थेट रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीजवळ पण आरोप फेटाळले, नेमका प्रकार काय?

    अकोला : राज्यात काँग्रेसमध्ये गटतटाचं राजकारण हे अनेकदा पाहायला मिळतं. असाच एक प्रकार अकोल्यात घडला आहे. काँग्रेसच्या पत्रकार परिषदमध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद होता माजी महापौर मदन भरगड आणि अभय पाटील यांच्यातील माजी मंत्री अजहर हुसेन यांच्या समोरच हा वाद झाला. हा वाद इतका टोकावर गेला की चक्क अभय पाटील रागाच्या भरात कक्षाच्या बाहेर पडले. त्यानंतर विविध चर्चेला उधाण आलं. दरम्यान भरगड यांना समजलं की पाटील हे रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गाडीकडे गेले. आणि तेही भरगड त्यांच्या वाहनाजवळ पोहचले. परंतु गाडीतून रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गेलो हे लागलेले आरोप पाटील यांनी फेटाळून लावले आहेत.

    अकोला आज विविध विषयांवरून काँग्रेसची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ही पत्रकार परिषद अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आज चार वाजताच्या सुमारास आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, माजी मंत्री अझर हुसेन, माजी महापौर मदन भरगड यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आपापली जागा राखून ठेवत खुर्चीवर बसले होते. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर थोड्या वेळात काँग्रेसचेच पदाधिकारी अभय पाटील येथे दाखल झाले.

    माजी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात काँग्रेसमध्ये गटबाजी, जिल्हाध्यक्ष पदावरुन मोठा वाद, नेमकं काय घडलं?
    अभय पाटील गाडीतून रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी खरंच गेले?

    भरगड म्हणाले, ‘मी’ पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच समोरच्या खुर्चीवर बसलो होतो. पत्रकार परिषद सुरू होताच काही क्षणात तेथे अभय पाटील मला म्हणाले की आपण इथून उठा, मला बसायचं आहे. त्यावेळी मी त्यांना एवढंच म्हणालो की मी पक्षात सीनियर आहे, आणि माजी महापौर देखील राहिलो आहे. त्यामुळे आपण ज्युनिअर असल्यामुळे मागे बसावं आणि ते पाठीमागे बसले. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी माझ्याशी खुर्चीवर बसण्यावरुन वाद घातला. ते मला रागाच्या भरात म्हणाले की ‘मी’ इथून बाहेर जातो, मी जा म्हटलं आणि ते तिथून निघून गेले. तेवढ्यात काही लोकांकडून समजलं की पाटील हे रिव्हॉल्व्हर आणण्यासाठी गेले. मी देखील म्हटलं बघतो आणू दया. अशाप्रकारे हा शाब्दिक वाद झाला, त्यांच्या गाडीजवळ बाहेर पण गेलो, मात्र त्यांनी रिव्हॉल्व्हर काढली नाही. विशेष म्हणजे पाहिली नाही, असे भरगड म्हणाले.

    जरांगेंनी जत्रा भरवली, मराठा समाज मागास नाही, त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही: गुणरत्न सदावर्ते
    मागील बैठकीत काँग्रेसच्या अकोला लोकसभा निवडणुकीसाठी अनेकांनी आपले नावे समोर ठेवली. या बैठकीत काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड यांनी ज्या लोकांनी पक्षासाठी मागील पाच वर्षात काय केलंय? पक्षासाठी कोणते आंदोलन केले? कोणते काम केलंय? याची पार्श्वभूमी तपासणी यावी, त्यानंतर त्यांनाच नियमाप्रमाणे उमेदवार घोषित करावे, म्हणजेच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. काँग्रेसचे अभय पाटील यांनी देखील आपलं नाव उमेदवारीसाठी पुढे केले होते, त्यातूनच त्याचाही रोष अभय पाटील यांच्या मनात असू शकतो, असं भरगड म्हणाले. विशेष म्हणजे अभय पाटील हे पाच वर्षात कोणत्याच बैठकीत हजर राहत नव्हते, आता उमेदवारीला माझा स्पष्टच विरोध असणार असल्याचे ते म्हणाले.

    भाजपवाले देश बिघडवत आहेत, आपण लोकांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि देश बिघडवण्यापासून वाचवू – उद्धव ठाकरे
    पाटील म्हणतात, माझ्यावरील चुकीचे आरोप

    पत्रकार परिषद संपल्यानंतर एक पत्रकार माझ्याजवळ आला आणि म्हणाला आपण सर्वांचा ग्रुप फोटो हवाय. त्यासाठी मी ग्रुपमध्ये उभा राहलो. त्यावेळी बाजूला भरगड देखील उभे होते, ते म्हणाले तुम्ही बाहेर जा, मी बाजूला हटलो, इथे बाहेर नाहीये, गेटच्या बाहेर जा. असे म्हणाले. त्यानंतर थोडा शाब्दिक वाद झाला, आणि बाहेर पडलो. पत्रकार दिनेश शुक्ला यांनी मध्यस्थी करत मला गाडीत बसवले आणि आपण शांत रहा आणि मी तिथून शांततेत निघालो. तसं पाहिलं तर माझ्याकडे लायसन्स रिव्हॉल्व्हर आहे, पण अशा प्रकारचे कोणतेही रिव्हॉल्व्हर काढण्याची धमकी मी दिली नाही. रिव्हॉल्व्हर माझ्याकडे असल्याने असा आरोप लावला जात असावा, अशी शक्यता पाटील यांनी व्यक्त केली.

    अकोला काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, माजी मंत्र्यासमोरच माजी महापौर अन् पदाधिकारी भिडले

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed