• Sat. Sep 21st, 2024
पुण्यात अतिक्रमणविरोधी मोहीम, अनेक वर्षांनंतर धडक कारवाई; दुकानदारांचे धाबे दणाणले

म. टा. प्रतिनिधी, पुणे, येरवडा : पुणे येरवडा परिसरात महापालिकेने शुक्रवारी जोरदार अतिक्रमण कारवाई करून रस्ते मोकळे केले. अनेक वर्षांनंतर महापालिकेकडून येरवड्यात धडक कारवाई झाल्याने भाजी विक्रेते आणि दुकानदारांचे धाबे दणाणले.

येरवडा परिसरात भाजी विक्रेते, हातगाडी, पथारी व्यावसायिकांनी अंतर्गत रस्त्यांवर दुकाने मांडून अतिक्रमणे केली आहेत. याशिवाय रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांनी समोर ओटे करून अतिक्रमणे केली आहे. त्यामुळे गाडीतळ ते अशोकनगर, लक्ष्मीनगर, गावठाण रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होत होती. महापालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त इंद्रायणी करचे यांच्यासोबत शुक्रवारी सकाळी चित्रा चौकात जाऊन अतिक्रमण परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात केली.

Manoj Jarange: राजकीय पुढाऱ्यांचं भोजन नको, आमची चटणी-भाकर पुरेशी; मराठा बांधव मनोज जरांगेंच्या सभेसाठी जालन्यात
गाडीतळ ते चित्रा चौकापर्यंत सर्वच दुकानांचे फ्रंट मार्जिन, ओटे तोडून रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर कारवाई करून रस्ते मोकळे केले. या वेळी काही विक्रेत्यांनी कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण अधिकारी कारवाईवर ठाम होते.

येरवडा परिसरात अंतर्गत रस्त्यांवर भाजी विक्रेते आणि हातगाडा व्यवसायिकांनी अतिक्रमणे केल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे येरवडा भागात शुक्रवारी अतिक्रमण कारवाई केली. रस्त्यावर दुकाने मांडून अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी चित्रा चौक, काश्मिरी कॉलनी आणि गाडीतळ या ठिकाणी फिक्स पॉइंट करण्याचा विचार आहे.

– इंद्रायणी करचे-गायकवाड, सहायक आयुक्त, येरवडा क्षेत्रीय कार्यालय

भारत-पाक सामन्यात टॉस जिंकल्यास संघ प्रथम गोलंदाजी की फलंदाजी निवडणार? जाणून घ्या कसं आहे पिच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed