अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजप-शिवसेना सरकारमध्ये प्रवेश केल्याने अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा होत आहेत, नुकतेच शरद पवार यांना या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्न आहे.. ही काही घडणारी गोष्ट नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. तसेच सुप्रिया सुळे यांनी दादा मुख्यमंत्री झाल्यावर पहिला हार मी घालणार असे वक्तव्य केले होते. याबद्दल उदयनराजे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की यावर माझे काय मत असणार असे म्हणत त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.
तसेच सध्याची परिस्थिती पाहता शरद पवारांनी निवृत्त व्हावे असे आपणास वाटते का? पत्रकारांच्या या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले की, नाही.. पण त्यांनी खरंतर मार्गदर्शक म्हणून भूमिका निभवावी, असे माझे स्पष्ट मत आहे. पवार साहेबांनी सल्लागार म्हणून काम करावे, या भूमकेत त्यांनी असणे गरजेचे आहे असे उदयनराजे यांनी स्पष्ट केले. शरद पवार राज्यात अनेक वेळा मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षण मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी सल्लागाराच्या भूमिकेत असणे जास्त गरजेचे आहे असे उदयनराजे म्हणाले.
तसेच काही गोष्टींचे ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळत नाही. अनुभव हा सगळ्यात मोठा शिक्षक असतो. त्यांचा अनुभव पाहता सर्वांना वाटतं की त्यांचा सल्ला घ्यावा असेही उदयनराजे म्हणाले. महाराष्ट्रातील राजकारण एकाच कुटुंबीयांच्या घरात फिरत आहे. यावर उदयनराजे म्हणाले की, कोणीही येऊ द्या चांगलेच आहे. वाद मिटला पाहिजे बस्स. असे म्हणत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
Read Latest Satara News And Marathi News