• Sat. Sep 21st, 2024

पिक विमा देता का शिंगाडे खाता? मंत्र्यांचे फोटो उलटे लावून राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मोर्चा

पिक विमा देता का शिंगाडे खाता? मंत्र्यांचे फोटो उलटे लावून राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्याची मागणी करीत आज शुक्रवारी जळगावात राष्ट्रवादीच्या किसान सेलकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक शिंगाडे मोर्चा काढण्यात आला. यावेळी, ‘पिक विमा देता का शिंगाडे खाता’ अश्या घोषणा देत शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. यावेळी जिल्ह्यातील तीन मंत्र्यांचे उलटे फोटो असलेल्या बॅनरद्वारे त्यांचा निषेध करण्यात आला.

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या आकाशवाणी चौकातील कार्यालयापासून दुपारी पावणेदोन वाजा मोर्चास सुरुवात झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी माजी पालकमंत्री डॉ. सतिष पाटील, माजी आमदार बी.एस. पाटील, दिलीप सोनवणे, किसान सेलचे सोपान पाटील, अशोक लाडवंजारी, इंदिरा पाटील, रिंकू चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित कार्यकर्त्यांनी हाता शिंगाडे घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

मंत्र्यांचे उलटे फोटो असलेले बॅनर

जळगाव जिल्ह्यात तीन मंत्री असतांनाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याने त्यााच निषेध म्हणून शिंगाडा मोर्चामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील या तिन्ही मंत्र्यांचे उलटे फोटो लावलेले बॅनर आंदोलकांनी अग्रभागी धरले होते. यावेळी केंद्र सरकार राज्य सरकार व केळी पिक विमा कंपनीच्या निषेधार्थ घोषणाबाजी देण्यात आली व या सरकारचा निषेध करण्यात आला शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे व केळी पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळावे अशी मागणी ही करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपला हक्काचा केळी फळ पिक विमा मिळण्यापासून शासनाकडून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करण्यात आला.

नाशिक ड्रग्ज प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, पाठोपाठ मुंबईत मोठी कारवाई, ८० कोटींचं ड्रग्ज जप्त

अन् आटोपली औपचारिकता

शिंगाडे मोर्चा मोठा होण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मात्र, दुपारी १ वाजेची वेळ असतांनाही दिड पर्यंत शंभर ते सव्वाशे पदाधिकारी व शेतकरीच जमल्याने दुपारी पावणेदोन वाजता शिंगाडे मोर्चा काढून राष्ट्रवादीने आंदोलनाची औपचारिकता पूर्ण केली.

कोळी समाजाच्या आंदोलनाला पाठींबा

मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याअगोदर कोळी समाजाच्या उपोषणाला भेट देत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठींबा जाहीर केला. यावेळी डॉ. सतिष पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

हिंगोली वाशिम महामार्गावर आंदोलन; आक्रमक शेतकरी अधिकाऱ्यावर संतापले

Read Latest Jalgaon News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed