• Sat. Sep 21st, 2024

पैसाही पैसा होगा! डिपॉजिट रकमेवर मिळणार अधिक व्याज; बँका, पतपेढ्या, सहकारी बँकांचा निर्णय

पैसाही पैसा होगा! डिपॉजिट रकमेवर मिळणार अधिक व्याज; बँका, पतपेढ्या, सहकारी बँकांचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी बहुतेक राष्ट्रीयीकृत बँका, नागरी सहकारी बँका, सहकारी सोसायट्या आणि पतसंस्थांनी ठेवींवरच्या व्याजदरात सुमारे एक ते दीड टक्क्याने वाढ केली आहे. एक ते तीन वर्षे कालावधीच्या ठेवींसाठी ही वाढ करण्यात आली असून, कर्जांचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि ठेवीदारांना आकर्षित करण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आल्याचे बँकिंग क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.

सध्या राष्ट्रीयीकृत बँकांनी ठेवींवरील व्याजदर ६ ते ६.७ टक्क्यांच्या घरात, तर सहकारी बँकांचे दर ७ ते ८ टक्क्यांच्या घरात आहेत. सहकारी पतसंस्थांनीही ठेवींवरील व्याजदरात वाढ केली असून, काही पतसंस्था ९ ते ९.५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. पुण्यातील कॉसमॉस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासह इतर काही बँकांनी ठेवींच्या व्याजदरामध्ये वाढ केली आहे. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ने व्याजदरामध्ये १.२५ टक्क्याची वाढ केली आहे. काही विशेष ठेव योजनांसाठी नवा दर लागू असेल. बँकेने एक वर्षासाठीच्या ठेवीसाठी ६.५० टक्के, एक वर्षापेक्षा अधिक कालावधीच्या ठेवींना ६.२५ टक्के दर निश्चित केला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के व्याजदर असेल. कॉसमॉस बँकेकडूनही ठेवींच्या व्याजदरात वाढ करण्यात येत असून, लवकरच सुरू होणाऱ्या बँकेच्या ठेव योजनेमध्ये ठेवीदारांना सुमारे एक ते दीड टक्के अधिक दर मिळेल, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीसह इतरही पतसंस्थांनीही व्याजदरांत वाढ केली आहे.

नाशिक ड्रग्ज प्रकरणाने महाराष्ट्र हादरला, पाठोपाठ मुंबईत मोठी कारवाई, ८० कोटींचं ड्रग्ज जप्त

शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा पॉलिसी अशा विविध प्रकारांमध्ये ठेवीदारांची विभागणी होते. बँकांमधील मुदत ठेवी हा गुंतवणुकीचा सर्वांत सुरक्षित पर्याय असून, ग्राहकांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीयीकृत आणि नागरी सहकारी बँका ठेवींवरील व्याजदरांमध्ये वाढ करीत आहेत. त्यामुळे पतसंस्थाही व्याजदर वाढवत आहेत. ठेवींवरील व्याजदर तीन वर्षांपूर्वीच्या पातळीला पुन्हा जातील.

– सुशील जाधव, विभागीय व्यवस्थापक, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी

माझ्या बाबांचे पैसे कधी देणार? ; जिजाऊ बँकेच्या आमसभेत तरुणीचे संचालकांवर गंभीर आरोप करत सवाल

Read Latest Pune News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed