२०२२ साली सोलापुरात नवरात्रोत्सव काळात दंगल
सोलापूर शहराचा इतिहास पाहता २००२ साली नवरात्रोत्सव काळात मोठी दंगल झाली होती. गौतमी पाटीलच्या यापूर्वी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांचा इतिहास पाहता प्रत्येक ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गर्दी नियंत्रण करण्यासाठी लाठीचार्ज वगैरे केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. गौतमी पाटीलचा नियोजित कार्यक्रम २३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सदर कालावधीत नवरात्रौत्सव चालू असतो. तर, पोलीस ठाण्याकडील उपलब्ध जास्तीत जास्त मनुष्यबळ विविध ठिकाणी बंदोबस्ताकरता वापरले जाते.
नवरात्रौत्सवादरम्यान यापूर्वीचा इतिहास पाहिला असता सन २००२ मध्ये दोन समाजामध्ये जातीय वाद झाल्याची घटना घडली होती. विजापुर नाका पोलीस ठाणे येथे २००२ साली झालेल्या दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव १९ ऑक्टोबर रोजीच्या गौतमी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीतील डिस्को दांडीया या कार्यक्रमास विजापूर नाका पोलीस ठाण्याकडुन परवानगी नाकारण्यात आली आहे.
पाच हजारांचे तिकीट दर
सोलापुरातील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनेने २३ ऑक्टोबर रोजी डिस्को दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमात प्रसिद्ध लावणी नृत्यांगिना गौतमी पाटील उपस्थिती लावणार होती. डिजिटल वृत्तवाहिनीने कार्यक्रमासाठी विविध दर आयोजित केले होते. व्हीव्हीआयपीसाठी ४९९९, व्हीआयपी ९९९, जनरलसाठी ४९९, असे दर ठरले होते. ऐनवेळी सोलापूर शहर पोलिसांनी दंगलीचं कारण देत गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.