• Tue. Nov 26th, 2024
    ट्रकमधून गांजाची तस्करी; डीआरआयला कुणकुण, टोलनाक्यावर गाडी अडवली, मोठा साठा हस्तगत

    नागपूर: गोपनीय माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने बोरखेडी टोलनाक्याजवळ एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. या ट्रकमधून सुमारे ५२० किलो गांजा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत एक कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपींनाही पथकाने पकडले. दररोज देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमधून देशाच्या इतर राज्यांमध्ये गांजाची अवैध तस्करी होते. तथापि, गांजा तस्कर जलद गती आणि कमी खर्चासाठी गाड्यांना त्यांची पहिली पसंती मानतात. तरीही माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रकचा देखील गांजा तस्करीसाठी वापर केला जातो.
    पुलाचे बांधकाम अर्धेच; पावसाळ्यात आदिवासी ग्रामस्थांची तारेवरची कसरत, श्रमदानातून लाकूड फाट्यापासून पूल बांधला
    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी नागपूरजवळील बोरखेडी टोलवर एक ट्रक थांबवण्यात आला. यानंतर त्या ट्रकची बारकाईने पाहणी करण्यात आली. पाहणी करत असताना ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आणि ट्रकच्या मालवाहू भागामध्ये अंगभूत पोकळी दिसून आली. त्यानंतर या पोकळीची तपासणी करण्यात आली तर या पोकळीत काही पॅकेजेस तयार करून ठेवण्यात आले होते. ती पोकळी तापसणी केली असता त्यात ५२० किलो गांजा आढळून आला. ज्याची किंमत १.०४ कोटी रुपये इतकी आहे. २४२ पॅकेजेसमध्ये हा गांजा पॅक केला गेला होता. या कारवाईत दोन आरोपींना एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता या दोन्ही आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

    राज ठाकरेंना समर्थन दिलं, देवेंद्र फडणवीसांना सवाल केला; तेजस्विनी पंडितच्या अडचणी वाढल्या

    नागपुरात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अंमली पदार्थांची तस्करी दुपटीने वाढली आहे. तरुण गांजा, एमडी अशी औषधे अनियंत्रित होत आहेत. त्यामुळे या तस्करीला आळा घालणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. नागपुरातील तरुण हे अंमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. शहरातील अमली पदार्थ तस्कर गांजा, चरस, ब्राऊन शुगर, एम.डी. या ड्रग्जची तस्करी करून तरुणांमध्ये पसरवली जात आहे. या तस्करीसाठी महाविद्यालयीन तरुणांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *