मुंबई: बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल असा सणसणीत टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना लगावला आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांना अंगार फुलवला होता, तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालो आहे. विचारांचा वारसा आमच्याकडेच असल्याचेही शिंदे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला. ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून हिदूत्वाची अँलर्जी असलेल्या काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही. बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती. त्यामुळे आझाद मैदान आणि क्रॉस मैदानात शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.