• Sun. Sep 22nd, 2024

हेमा उपाध्याय आणि वकील हत्या प्रकरण, चित्रकार चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा

हेमा उपाध्याय आणि वकील हत्या प्रकरण, चित्रकार चिंतन उपाध्यायसह तिघांना जन्मठेपेची शिक्षा

मुंबई: २०१५ मध्ये झालेल्या हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरीश भंबानी यांच्या हत्येतील मुख्य आरोपी चित्रकार चिंतन उपाध्याय आणि तीन मारेकरी विजय राजभर, प्रदीप राजभर आणि शिवकुमार राजभर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिंडोशी सेशन्स कोर्टाने हा निर्णय सुनावला आहे.

नेमकं प्रकरण काय?

२०१५ मध्ये घडलेले हेमा उपाध्याय प्रकरण खूप चर्चेत होते. मुंबकांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील नाल्यात १२ डिसेंबरला दोन मृतदेह सापडले होते. ते हेमा उपाध्याय आणि हरीश भंबानी यांचे असल्याचं दुसऱ्या दिवशी उघडकीस आलं होतं. जगप्रसिद्ध चित्रकार हेमा उपाध्याय यांच्या खुनामुळे कलाविश्व हादरलं होतं. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडाचा कसून तपास सुरू केला होता.

माहेरशी जोडणारा एकुलता एक धागाही तुटला, तीन बहिणींच्या भावाचं राहत्या घरात टोकाचं पाऊल
कलाकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरेश भंबानी यांची ११ डिसेंबर २०१५ रोजी हत्या करण्यात आली होती. दोघांचेही मृतदेह कार्डबोर्ड बॉक्समध्ये टाकून मुंबईतील कांदिवली परिसरातील नाल्यात फेकण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणात विशेष न्यायालयाने चिंतन उपाध्याय, शिवकुमार राजभर, प्रदीप राजभर आणि विजय राजभर यांना दोषी ठरवले आहे. या सर्वांवर हत्या करून मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचा आरोप आहे.

पोलिस चौकशीत चिंतनने गुन्ह्याची कबुली दिली होती. यानंतर प्रदीर्घ सुनावणी सुरू होती. फिर्यादी पक्षाने आपल्या अंतिम युक्तिवादात चिंतन उपाध्याय हा त्याची पत्नी आणि तिच्या वकिलाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद केला. चिंतन उपाध्याय या दोघांचा द्वेष करत असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील वैभव बागडे यांनी केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी चिंतन उपाध्याय याला पत्नीच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

चिकन नूडल्स खाऊन आयुष्यभराचं अपंगत्व आलं, थोडक्यात जीव वाचला, नेमकं काय घडलं?
कोण होत्या हेमा उपाध्याय?

हेमा उपाध्याय या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकार होत्या. पेंटिंग्स आणि फोटोग्राफीसाठी त्या प्रसिद्ध होत्या. २००१ मध्ये केमोल्ड गॅलरीमध्ये स्वीट स्वेट मेमरीज नावाचे त्यांचे पहिले प्रदर्शन भरवण्यात आले होते. या व्यतिरिक्त, २००१ मध्ये, त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आर्टस्पेस, सिडनी आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न आर्ट, ब्रिस्बेन येथे आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांनी The Nymph And The Adult नावाची कलाकृती प्रदर्शित केली होती.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed