• Mon. Nov 25th, 2024

    हे खरंय का? धादांत खोटं आहे! फडणवीसांचा ताजा व्हिडिओ दाखवत टोलवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल

    हे खरंय का? धादांत खोटं आहे! फडणवीसांचा ताजा व्हिडिओ दाखवत टोलवरून राज ठाकरेंचा हल्लाबोल

    मुंबई : मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवर १ ऑक्टोबरपासून दरवाढ करण्यात आल्यानंतर टोलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी उपोषण करत टोल दरवाढीला विरोध केला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल जाधव यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र आता टोलप्रश्नावरून राज ठाकरे आक्रमक झाले असून राज यांनी आज पत्रकार परिषद घेत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांवर घणाघाती टीका केली आहे.

    राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी टोलबाबत दिलेल्या आश्वासनांचे जुने व्हिडिओ दाखवले. तसंच टोलमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या वक्तव्याचाही व्हिडिओ दाखवला. पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना काल देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की, राज्यातील सर्व टोलनाक्यांवर आम्ही चारचाकी आणि इतर छोट्या वाहनांना टोलमाफी दिली आहे. केवळ कमरशिअल वाहनांना टोल आकारला जात असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं होतं. फडणवीस यांच्या या वक्तव्याचा राज यांनी जोरदार समाचार घेतला. ‘फडणवीस यांचं हे म्हणणं खरं आहे का? हे धादांत खोटं आहे,’ असं ते म्हणाले.

    Assembly Election 2023: लोकसभेच्या लिटमस टेस्टचा मुहूर्त ठरणार, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा

    दरम्यान, टोल हा अनेक राजकीय नेत्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यामुळे हे नेते टोल बंद करू शकत नाहीत, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *