• Sat. Sep 21st, 2024
वडिलांच्या कर्जापायी लेकानं स्वत:च्या आयुष्याची दोर कापली; एका चिठ्ठीमुळे गुन्हा उघड

पुणे : वडिलांनी परस्पर नावावर कर्ज काढल्याने; तसेच आर्थिक कोंडी केल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या तरुण कंत्राटदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धानोरी येथे मे महिन्यात घडलेल्या या घटनेप्रकरणी तरुणाचे आई-वडील आणि भावावर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजित मच्छिंद्र कदम (वय ३८, रा. धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची पत्नी दीपाली यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीचा दीर अनिकेत मच्छिंद्र कदम (वय ३१), सासू कुसुम मच्छिंद्र कदम (वय ५६) आणि सासरे मच्छिंद्र नामदेव कदम (वय ६२) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur Rain: भयंकर! घराचं दार उघडताच मृत्यू आत शिरला, नागपूरच्या पावसाची अंगावर काटा आणणारी कहाणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली आणि अभिजित यांच्या प्रेमविवाहाला घरून विरोध होता. हे दाम्पत्य पाच-सहा वर्षांपासून वेगळे राहत होते. अभिजित यांच्या कृष्णा साई सर्व्हिस कंपनीने आळंदी नगरपालिकेच्या कामाचे कंत्राट घेतले होते. कंपनीतून मिळालेले पैसे वडील मच्छिंद्र घ्यायचे. गावाकडील घरासाठी त्यांनी ८५ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. त्या कर्जाचे हप्ते अभिजित यांच्या खात्यातून वळते केले जात होते. त्यांनी पालिकेच्या कामासाठी नेमलेल्या कामगारांचे वेतन आणि इतर खर्चासाठी पैसे कमी पडत होते. कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी वडील आणि भावाकडे पैशांची मागणी केली असता त्यांनी टाळाटाळ केली. या नैराश्यातून त्यांनी १८ मे २०२३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली.

चिठ्ठीमुळे गुन्हा उघड

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून ती का केली, याविषयीची माहिती समोर आली आहे. मात्र, या चिठ्ठीत खाडाखोड असल्याने पोलिसांनी ती तपासणीसाठी हस्ताक्षरतज्ज्ञांकडे पाठवली होती. त्यांच्या अहवालानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.

Mumbai News: मुंबईत जंगलाच्या पोटात भूमिगत बोगद्यांचा प्लॅन, पूर्व आणि पश्चिम उपनगरांची कनेक्टिव्हिटी वाढणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed