• Sat. Sep 21st, 2024
आधी सरकारला झुकवलं, आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे राज्यभरात फिरुन हवा तापवणार

जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावीत, या मागणीसाठी तब्बल १७ दिवस उपोषणाला बसून संपूर्ण राज्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घेणाऱ्या मनोज जरांगे-पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्यव्यापी दौरा करायचे ठरवले आहे. जरांगेंच्या उपस्थितीत जालन्यात मराठा समाजाची विचार मंथन बैठक संपन्न झाली. या बैठकीत जरांगेंनी मराठा समाज बांधवांना केलं मार्गदर्शन केले.आरक्षणाविना मराठा समाजातील पाच पिढ्या बरबाद झाल्या आहेत, यापुढील पिढ्या बरबाद होऊ देणार नाही. सत्ताधारी,विरोधकांनी कितीही दडपण आणले तरीही आता माघार घेणार नाही,असा इशारा अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याचा दौरा करणार असून त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मेळावा घेणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले आहे.

अंतरवाली सराटी येथे शनिवारी जरांगे यांच्या उपस्थितीत मराठा समाजाची विचार मंथन बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्याकडे असे कोणतेही हत्यार व शक्ती नाही की त्याचा वापर करून ते मला फोडू शकतील. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत त्यांचा डाव चालणार नाही. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यांची शान मराठा समाजाने वाढविली आहे. आता कोण नागपूरला जातेय,कोणी कोल्हापूरला जातेय,कोणी पुण्याला जाऊन उचूकन देतेय. कोणी कितीही उचकावले तरी मराठा समाज व ओबीसी समाज वाद घालणार नाही व आम्ही समोरासमोर येणार नाहीत. दिलेल्या मुदतीत शासनाने आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमरण उपोषण पुन्हा सुरू केले जाईल,असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. राज्यातील समाज बांधवांनी शांततेत आंदोलन करावे, कोठेही उद्रेक करू नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं पण कुटुंबीय मागे हटेना, सरकारला इशारा देत लढण्याचा इरादा कायम!

मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं,त्यांना पुरावे कुठं मागतायत.आमच्याकडे गाड्याच्या गाडे पुरावे असूनही आम्हाला आरक्षण नाही. दोन दिवसात गुन्हे परत घेतो असे सांगितले होते.परंतु,अद्याप गुन्हे परत घेतलेले नाहीत. यामुळे आता आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे.यासाठी राज्यव्यापी मेळावा घेतला जाणार असून,मेळाव्याला ३५ लाखावर मराठा समाज बांधव येणार आहेत. मेळाव्यासाठी १० ते १२ दिवसांचा राज्यव्यापी दौरा करणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.साखळी उपोषणाच्या नवव्या दिवशी शनिवारी रेणापुरी गावातील नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.

सरकारला ४०व्या दिवशी आरक्षण द्यावे लागले; समितीबद्दल मनोज जरांगे पाहा काय म्हणाले

१४ तारखेला अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा कार्यक्रम

राज्य सरकारला जागं करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. मुख्यमंत्र्यांच्या हाताने फळांचा रस घेऊन उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांनी राज्य सरकारला ४० दिवसांची मुदत दिली आहे.या दिवसात मराठा समाजाला आरक्षण आणि सरसकट कुणबी प्रमाण देण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी सरकारनं एक समितीही स्थापन केली आहे.त्यासाठी सरकारला पुन्हा जागं करण्यासाठी येत्या १४ तारखेला अंतरवाली सराटीत मराठा समाजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.या कार्यक्रमाला मनोज जरांगे संबोधित करणार असून त्यावेळी सरकारला जाब विचारणार आहेत.

जरांगेंच्या उपोषण स्थळी मुसळधार पाऊस, मंडप कोसळला तरी आंदोलक बसूनच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed