• Sat. Sep 21st, 2024

अशिक्षितांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी अधिक; २०२३च्या अहवालातील धक्कादायक वास्तव

अशिक्षितांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारी अधिक; २०२३च्या अहवालातील धक्कादायक वास्तव

तुषार धारकर, नागपूर : उच्चशिक्षण घेतले की रोजगाराच्या संधी वाढतात, असे मानले जाते. मात्र, खऱ्या अर्थाने देशातील अशिक्षित तरुणांपेक्षा शिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण तीनपट आहे. देशातील २५ वर्षांखालील वयोगटातील पदवीधर झालेले ४२ टक्के तरुण कामाविना आहेत, अशी धक्कादायक माहिती स्टेट ऑफ वर्किंग इंडिया-२०२३ या अहवालातून पुढे आली आहे.

अजीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. यात देशातील रोजगाराच्या स्थितीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षांखालील १३.५ टक्के अशिक्षित मुले बेरोजगार आहेत तर त्याच्या तीनपट म्हणजेच ४२ टक्के पदवीधर तरुण बेरोजगार आहेत.

एक-तृतीयांश महिलांचा घराबाहेर प्रवास

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील एक-तृतीयांश महिला कामासाठी घराबाहेर पडतात. घराच्या दीड किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करणाऱ्या महिलांचा यात समावेश करण्यात आला आहे. शहरी भागात महिलांचे हे प्रमाण राज्यात सुमारे ५४ टक्के आहे. देशातील राज्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर येतो.
भारतात अंगणवाडी केंद्रांतील ४३ लाख बालके लठ्ठ; कोणत्या राज्यात प्रमाण कमी, कुठे जास्त? जाणून घ्या
स्वयंरोजगारापेक्षा रोजंदारीचे उत्पन्न जास्त

महाराष्ट्रात स्वयंरोजगार करणाऱ्या कामगारांपेक्षा रोजंदारीवर जाणारे कामगार अधिक कमाई करतात असे अहवालात म्हटले आहे. राज्यातील रोजंदारीवरचे कामगार प्रतिमहिना २० हजार ८९५ रुपये कमावतात तर स्वयंरोजगार करणारे कामगार केवळ १४ हजार १२० रुपये कमाई करतात. राज्यातील कामगारांचे सरासरी उत्पन्न १४ हजार ४७१ रुपये इतके आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed