• Thu. Nov 28th, 2024
    पनवेल-CSMT लोकल एक डबा पुढे थांबली, प्रवाशांची धावपळ, फलाटावर गोंधळ, कारण काय?

    मुंबई : पनवेल-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलच्या मोटरमनने खांदेश्वर रेल्वे स्थानकात फलाटातील निश्चित थांबा ओलांडल्याची घटना शुक्रवारी घडली. यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र, यामुळे फलाटावर काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, काही मिनिटांनंतर प्रवाशांसह लोकल सीएसएमटीच्या दिशेने रवाना झाली.

    मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील खांदेश्वर रेल्वे स्थानकात दुपारी चार वाजता पनवेल-सीएसएमटी लोकल दाखल झाली. लोकलला सीएसएमटी दिशेला जाण्यासाठी हिरवा सिग्नल देण्यात आला होता. मात्र रुळांवरील निर्धारित ठिकाणी लोकल न थांबात एक डबा पुढे जाऊन लोकल थांबली. यामुळे लोकल पकडण्यासाठी प्रवाशांना धावत डब्यांजवळ पोहोचावे लागले. दुपारच्या वेळेत पनवेलहून नुकतीच लोकल निघाल्याने गाडीमध्ये जास्त गर्दी नव्हती. मात्र, या घटनेने प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा सीएसएमटी सिग्नल ओलांडण्याच्या घटनेची चर्चा सुरू झाली होती.

    Weather forecast: तुरळक ठिकाणी मुसळधार, राज्यात पाऊस २४ तास सक्रिय ते अतिसक्रिय असण्याची शक्यता
    हार्बर मार्गावरील खांदेश्वर रेल्वे स्थानकात पनवेल-सीएसएमटी लोकलच्या मोटरमनकडून निर्धारित ठिकाणी गाडी न थांबवल्याची (प्लॅटफॉर्म ओव्हरशूटिंग) घटना घडली. यामुळे काही काळ फलाटावर गोंधळ निर्माण झाला होता, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. निर्धारित जागेवर थांबण्यासाठी लोकलचे ब्रेक कार्यान्वित केले होते. मात्र ब्रेक लागले नाही, असा दावा संबंधित मोटरमनने केला आहे. या प्रकरणी मोटरमनचा जबाब नोंदवून रेल्वे प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. एक सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये मोटरमनने सिग्नल ओलांडल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित मोटरमनला निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    चंद्रपुरात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या रवींद्र टोंगेंची प्रकृती ढासळली, आयसीयूमध्ये दाखल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed