बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापनानुसार, ही आग जमिनीपासून १२व्या मजल्यापर्यंतच्या इलेक्ट्रिकल डक्टमधील इलेक्ट्रिकल वायरिंग, भंगार साहित्य इत्यादींपर्यंत पसरली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) सांगितले की, या आगीत ४३ रहिवाशांची गुदमरल्यामुळं प्रकृती बिघडली होती. त्यापैकी ३९ लोकांना नागरी संचालित राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले होते आणि उर्वरित चार जणांना कोहिनूर रुग्णालयात नेण्यात आले होते. यापैकी २९ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
रुग्णालयात भरती झालेल्यांपैकी १० रहिवाशांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार डिस्चार्ज घेतला, तर उर्वरितांची प्रकृती स्थिर आहे. कोहिनूर रुग्णालयात दाखल झालेल्यांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली.