• Sat. Sep 21st, 2024

मराठवाड्याला हादरवून टाकणारं प्रकरण,संजय बियाणींवर गोळीबार करणारा नांदेड पोलिसांच्या ताब्यात

मराठवाड्याला हादरवून टाकणारं प्रकरण,संजय बियाणींवर गोळीबार करणारा नांदेड पोलिसांच्या ताब्यात

अर्जुन राठोड, नांदेड : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हत्याकांडातील गोळीबार करणाऱ्या दोघांपैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. नांदेड पोलिसांनी पंजाब येथील कारागृहातून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दिपक उर्फ दिपुना उर्फ सुनिल सुरेशकुमार रंगा (२३) रा.सुरखपुर ता.जि.झज्जर, राज्य हरियाणा, असं या आरोपीचे नाव आहे. सोमवारी आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २१ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीच्या अटकेनंतर नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

५ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. शारदा नगर येथील त्यांच्या घरासमोर सकाळी ११ च्या सुमारास ही घटना घडली होती. दुचाकीवरुन पाठीमागून आलेल्या दोघांनी बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अजितदादांसोबतचा ‘तो’ व्हिडिओ लागला, अन् सुप्रिया सुळे डोळ्याला पदर लावून रडू लागल्या, पाहा VIDEO
विशेष पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. दहशतवादी हरविंदर सिंह उर्फ रिंदा या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड असल्याची बाब तपासा दरम्यान समोर आली. खंडणी न दिल्याने संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी आता पर्यंत
मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे, सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल, इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरकसिंघ मेजर, हरदिपसिंघ उर्फ सोनू पिनीपाना सतनामसिंघ बाजवा, गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल, करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहू, हरदिपसिंघ उर्फ हर्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे, कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार, हरीश मनोज बाहेती, रणजित सुभाष मांजरमकर, सरहानबिन अली अलकसेरी, गुरप्रितसिंघ उर्फ दान्या उर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा, कमलकिशोर गणेशलाल यादव, सुनिल उर्फ दिपक पिता सुरेश, दिव्यांश उर्फ पहेलवान रामचेत यांना अटक केली आहे.

धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर; आरक्षण वगळल्याने सीईओच्या कार्यालयाची तोडफोड
संजय बियाणी यांच्यावर गोळीबार करणारा दिपक रांगा हा फरार होता. आठ महिन्यापूर्वी एनआयएने दिपक रांगा याला नेपाळ बॉर्डर वरुन अटक केली होती. ९ मे २०२२ रोजी आरोपीने पंजाब पोलिसांच्या गुप्तहेर विभाग कार्यालयावर बॉम्बने हल्ला केला होता. या प्रकरणी एनआयएने २२ जानेवारी २०२३ रोजी अटक केली होती. रविवारी चंढीगड कारागृहातून आरोपी दिपक रांगा याला नांदेड पोलिसांच्या ताब्यात घेतले. आज आरोपीला नांदेड न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने १२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुख्य शूटर अटक झाल्याने संजय बियाणी खून प्रकरणातील नवी माहिती समोर येणार आहे.

आतापर्यंत मतांचा पाऊस पण यंदा जयंतरावांचा करेक्ट कार्यक्रम? कारण विरोधकांनी तगडी फिल्डिंग लावलीये!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed