• Sat. Sep 21st, 2024

अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत राजकारणातून निवृत्तीचं वक्तव्य कुणासाठी केलं? जाणून घ्या

अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत राजकारणातून निवृत्तीचं वक्तव्य कुणासाठी केलं? जाणून घ्या

कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधील सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोल्हापूरची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची सभा आहे हे मला महाराष्ट्राला सांगायचं आहे, असं ते म्हणाले. मुंबई आर्थिक राजधानी, पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं त्या प्रमाणं कोल्हापूर हे महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळींचं केंद्र म्हणून ओळखलं जातं, असं अजित पवार म्हणाले. राजर्षी शाहू महाराजांच्या भूमीमध्ये आलो आहे, आज आई अंबाबाईच्या समोर नतमस्तक होत बळीराजावर आलेलं सावट दूर व्हावं, असं साकडं घातल्याचं अजित पवार म्हणाले. राज्यात समाधानकारक पाऊस चांद्यापासून बांद्यापर्यंत पडावा, असं अजित पवार म्हणाले.

राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत सामाजिक सुधारणा, शिक्षण, उद्योगधंदे, आरक्षण, रोजगार अनेक गोष्टींमध्ये मार्गदर्शनाचं काम केलं आहे. आम्ही सारथी आणि महाज्योतीच्या वतीनं विविध ठिकाणी वसतीगृह निर्माण करत आहोत, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार आणि बाकीच्या सहकाऱ्यांनी दबाव होता म्हणून निर्णय घेतल्याची टीका केली जाते. आमच्यावर लोकांची कामं पूर्ण करण्याचा दबाव होता. अडीच वर्षात सत्तेत असताना जी कामं हाती घेतली होती ती पूर्ण करण्याचा दबाव होता. आमच्या कामांना स्थगिती मिळालेली होती ती स्थगिती उठण्याचा दबाव होता. आम्हीपण मराठ्यांची औलाद आहे, आम्ही पण शेतकऱ्यांची लेकरं आहोत, अशं अजित पवार म्हणाले.
पावसानंतर पाकिस्तान विजयासाठी २४ षटकांत किती धावांचे असेल आव्हान, जाणून घ्या समीकरण…
राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी केली होती. ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्ज फेडलं त्यांना अनुदान मिळणं बाकी आहे. आजच्या सभेच्या निमित्तानं सांगतो की तातडीनं यादी तयार करा, नियमामध्ये बसतात पण निधी आला नाही म्हणून जे शेतकरी राहिलेत त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचं काम करणार आहे. आम्ही याच्या करता सत्तेत गेलो आहे. विरोधी पक्षात असतो तर हे झालं असतं का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
Ajit Pawar: कोल्हापूरच्या सभेपूर्वी अजित पवारांची मोठी घोषणा,कार्यकर्त्यांना आदेश, सांगलीत काय म्हणाले?
आम्हाला लोकांच्या कामाचा दबाव होता. काम करणाऱ्यांना हातावर हात ठेऊन बसता येत नाही. माझे सहकारी लोकांची कामं करणारे आहेत. आम्ही काम करत असू तर महाराष्ट्रानं आम्हाला पाठिंबा का द्यायचा नाही? नकारात्मक राजकारण करणं आणि दूषणं देणं हे माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं काम नाही. लोककल्याणकारी योजना शेवटच्या माणसाठी राबवल्या पाहिजेत. लोककल्याणासाठी महायुतीत सहभागी झालो आहोत.

उद्धव ठाकरेंचं सरकार ज्यावेळी पडत होतं, त्यावेळी सगळ्या आमदारांनी महायुतीत सामील व्हा, असं पत्र दिलं होतं. हे खोटं असेल तर राजकारणातून निवृत्त व्हा, असं आव्हान अजित पवार यांनी दिलं.
Good News : कशेडी बोगद्यातील एका लेनची ट्रायल यशस्वी, वाहतूक कधी सुरु होणार? नवी अपडेट समोर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed