नागपूर : प्रेयसीच्या मदतीने वाहन चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक कार आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी हा व्यावसायिक गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याची प्रेयसी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही, तिचा शोध सुरू आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला आंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्हे शाखेच्या वाहन विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर आंबाझारी पोलीस ठाण्यांतर्गत चोरीची एर्टिगा कार जप्त करून आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी वृषभ कमल मिश्रा असून तो आपल्या प्रेयसीसोबत शहरात वाहन चोरीच्या घटना घडवत होता. आंबाझरी येथील रहिवासी तक्रारदार रामदास उके यांचे घराच्या इमारतीच्या पार्किंगमधून २५ मार्च रोजी रात्री अज्ञात आरोपींनी अर्टिगा कार चोरली होते. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.
Maharashtra Weather Forecast : राज्यासाठी २४ तास महत्त्वाचे, मुंबई, ठाण्यासह २९ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाला काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले होते, त्याआधारे पोलिसांनी आरोपी वृषभ मिश्रा याला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा प्रेयसीसह कार चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडून सात लाख रुपयांचे चोरीचे वाहनही जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपीने बुटीबोरी येथील रहिवासी असलेली त्याची मैत्रीण शीतल चौधरी हिच्यासोबत अजनी परिसरासह इमामवाडा पोलीस ठाण्यांतर्गत दुचाकी चोरल्याची कबुली दिली, त्यानंतर पोलिसांनी आरोपी कडून आणखी दोन दुचाकी जप्त केल्या.
वृषभ विवाहित असून तो पत्नीला सोडून त्याची प्रेयसी शीतलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगण्यात येत आहे, तर शीतलचेही लग्न झाले असून तिनेही पतीला सोडले आहे. याप्रकरणी शीतल अद्याप फरार असून तिचा शोध सुरू आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला आंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Thane Bandh : सोमवारी ठाणे बंद; सकल मराठा मोर्चाचा निर्णय, सर्वपक्षांसह संभाजी ब्रिगेडचाही पाठिंबा