कोकणात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने भक्ती भावाने साजरा केला.अगदी सातासमुद्रा पार असलेला चाकरमानी सुद्धा गणेशोत्सवासाठी आवर्जून येतो. कोकणातल्या गणेशोत्सवाला अवघे ९ दिवस राहिले आहेत.चाकरमानी हळूहळू आपल्या कोकणातल्या मूळ गावी यायला सुरुवात झाली आहे.
दरम्यान गणेश उत्सव झाल्यानंतर कोकणात लगेचच दिवाळीपासून गणेश मूर्ती घडवायला सुरुवात केली जाते. जवळपास कोकणातल्या प्रत्येक गणेश शाळेमध्ये २०० ते ८०० पर्यंत मूर्ती असतात. इंटरनेटवर गणपतीचे फोटो शोधून गणेश भक्त त्यानुसार मूर्तीची मागणी करतात.त्यामुळे मागणीनुसार मुर्ती घडवली जाते.त्याच प्रमाणे प्रत्येक गणेश शाळेत १ फूट पासून ७ फुटापर्यत मूर्ती घडवली जाते. ७ फुटांची मूर्ती सार्वजनिक गणेशोत्सवासाठी विराजमान केली जाते.
शाडूच्या मातीचा दर वाढल्यामुळे यंदा मूर्तींचे किंमतीही वाढले आहेत. लोकांच्या मागणीनुसार मूर्ती घडवावी लागते त्यानुसार मूर्ती घडविण्यासाठी कारागीर बाहेरून मागवावे लागतात.त्यामुळे त्यांचीही मजुरी वाढली आहे.त्यामुळे १ फूट मूर्ती मागे ३०० ते ४०० रुपये किंमत वाढली आहे.अवघे काही दिवस गणेशोत्सवाला राहिले आहेत.त्यामुळे ८० टक्के मूर्तींचे काम पूर्ण झाले आहे. २० टक्के काम बाकी राहिले आहे असं गणेश शाळेतील मूर्तीकार सांगत आहेत.
बाजारपेठांमध्ये रंगाचे दर वाढलेले आहेत आणि ग्राहकांची जशी मागणी असते त्या मागणीनुसार मूर्ती बनवून देत असल्यानं दरवाढ झाल्याचं मूर्तीकारांनी सांगितलं आहे. त्यामुळं यंदा देखील महागाईचं सावट गणेशोत्सवावर पडणार आहे. गणेशमूर्तींची दरवाढ झाल्यानं यंदा गणेशभक्तांना अधिकची रक्कम खर्च रावी लागणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होणार आहेत. राज्य सरकारकडून देखील अधिकच्या बसेस कोकणात सोडल्या जाणार आहेत.