• Sat. Sep 21st, 2024

अंत्ययात्रेसाठी जाताना डंपरने धडक दिली; भीषण अपघात मायलेकाचा जागीच मृत्यू

अंत्ययात्रेसाठी जाताना डंपरने धडक दिली; भीषण अपघात  मायलेकाचा जागीच मृत्यू

देवगड: सिंधुदुर्गातील देवगड-निपाणी राज्य मार्गावर तोरसोळे फाटा येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतला आहे. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवगड निपाणी या राज्य मार्गावर दररोज ओव्हरलोड वाहतूक सुरू असते. या मार्गावरून दहा चाकी ट्रक चिरे वाहतूक मोठ्या प्रमाणात करत असतात. तळेबाजार बाजारपेठ येथील महेश तोरस्कर हे आपल्या आईला घेऊन कसाल येथे नातेवाईकाचे निधन झाल्याने अंत्ययात्रेसाठी चारचाकीने जात होते. सकाळीच्या सुमारास जात होते.मात्र तोरसोळे फाटा येथे नांदगावच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांच्या चारचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातात तळेबाजार येथील आई व मुलगा जागीच ठार झाले. महेश मोहन तोरस्कर (४८) व श्रीमती मनीषा मोहन तोरस्कर (७८) दोन्ही रा. तळेबाजार बाजारपेठ अशी मृतांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली आणि अपघात घडलेल्या गाडीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र स्थानिक ग्रामस्थांनी ओव्हरलोड वाहतूक होत असल्यामुळे राज्यमार्ग रोखून धरला. याबाबत पोलीस प्रशासनाने योग्य तो मार्ग काढावा अशी भूमिका स्थानिक ग्रामस्थांनी देखील घेतली होती. या अपघाताची माहिती मिळतात देवगड पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाठविण्यात आले अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.

आमदार अभिमन्यू पवारांच्या माणुसकीचं दर्शन; अपघातग्रस्तांना स्वत: च्या गाडीतून रुग्णालयात नेलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed