• Sat. Sep 21st, 2024
विद्यार्थी चळवळीचं प्रॉडक्ट, आक्रमक कार्यकर्ता; विखे-पाटलांवर भंडारा उधळणारा शेखर बंगाळे कोण?

सोलापूर: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष शेखर बंगाळे यांनी भंडारा उधळला आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशा घोषणा देताना,शेखर बंगाळेला अटक केली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताबडतोब त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं आहे. काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे हे धनगर समाजाचे नेते आहेत. त्यांनी ताबडतोब सदर बाजार पोलीस ठाण्यात येऊन माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे हे शेखर बंगाळेना शासकीय विश्रामगृह येथे घेऊन गेले. त्यावेळी भंडारा उधळला.

काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रतिक्रिया दिली,भंडारा हा धनगर समाजाचा पवित्र भंडारा आहे. ती काही शाई नव्हती. भाजपचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे हे धनगर समाजाचे आहेत. त्यांनी देखील घटनास्थळी शेखर बंगाळेना मारहाण केली. त्यांना धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत देणेघेणे नाही का असा सवाल उपस्थित काँग्रेसचे शहर अध्यक्ष व धनगर समाज कृती समितीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी उपस्थित केला आहे.

यळकोट यळकोट जय मल्हारचा नारा! धनगर आरक्षण समितीच्या कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळला

शेखर बंगाळेनी यापूर्वी विनोद तावडेवर भंडारा उधळला होता

शेखर बंगाळे हा सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीमधून समोर आला आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नाम विस्तारासाठी धनगर समाजाच्या नेत्यांनी मागणी केली होती. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी जोर धरत असताना शेखर बंगाळे प्रकाशझोतात आला होता. शेखर बंगाळे याने तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी भंडारा उधळला होता.सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी कृती चळवळ मधून शेखर बंगाळे विविध कारणांनी चर्चेत आला.

Maratha Reservation: तुमची प्रमुख मागणी पूर्ण झालेय, जरांगे-पाटलांनी विषय जास्त ताणू नये: विखे-पाटील

विविध मार्गांनी आंदोलन करत निवेदन देत नेहमी चर्चेत

शेखर बंगाळे याने सोलापूर विद्यापीठ मधून शिक्षण पूर्ण केल्या नंतर ,विविध मार्गांनी आंदोलनाचा पवित्रा सुरूचा ठेवला.सोलापुरातील विविध पोलीस ठाण्यात शेखर बंगाळेवर गुन्हे दाखल आहेत.अवैध धंदे सोलापुरात सुरू आहेत यावर शेखरने जिल्हाधिकाऱ्यांना शाळेच्या पाटीवर निवेदन लिहून अवैध धंदे बंद करा अशी मागणी केली होती.

विखे पाटलांच्या अंगावर भंडारा उधळला, धनगर समाजाच्या आरक्षणावरुन कार्यकर्ता आक्रमक, पोलिसांनी घेतलं ताब्यात!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed