• Sat. Sep 21st, 2024
त्र्यंबकेश्वरला जाताय तर सावधान, भाविकांसाठी मोठी बातमी; अन्न औषध प्रशासनाची कारवाई

नाशिक : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. आता तर श्रावणचा महिना चालू असून भाविकांची लाखोच्या संख्येने मांदियाळी पाहावयास मिळत आहे. त्यामुळे त्रंबकेश्वर मंदिर परिसरात असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांना देखील आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळत आहे.परंतु काही व्यावसायिकांकडून आलेल्या भाविकांची फसवणूक देखील केली जात आहे. विशेष म्हणजे मंदिराबाहेर असलेल्या काही पेढे विक्रेत्यांकडून भेसळयुक्त पेढे विकले जात आहेत.

मंदिरात दर्शनासाठी जाताना आपण प्रसाद मंदिराच्या बाहेरुन घेतो. बऱ्याचदा मंदिराबाहेरील दुकानांमध्ये महाग मिळत असल्याने किंवा प्रसाद जास्त प्रमाणात घ्यायचा असेल तर मंदिराबाहेर हातगाडीवर लावण्यात आलेल्या छोट्या ठेलेवाल्यांकडूनही प्रसाद घेतला जातो. आपण अगदी डोळेझाकून तो घेत असतो, तुम्ही जर ही चूक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होते. या भाविकांच्या जीवाशी खेळ काहीजण करत आहेत.

यळकोट यळकोट जय मल्हारचा नारा! धनगर आरक्षण समितीच्या कार्यकर्त्याने राधाकृष्ण विखे-पाटलांवर भंडारा उधळला
त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अन्न औषध प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. FDA ने निकृष्ट दर्जाचे पेढे आणि मिठाई देणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. मलाई पेढा म्हणून विक्री होणाऱ्या पेढ्यात मलाई नसल्याचं समोर आलं आहे. भाविकांना फसवून त्यांच्याकडून दुपटीने पैसे उकळत असल्याची माहिती कारवाईदरम्यान मिळाली आहे. मलाई पेढ्यात दुधापासून तयार केलेली मलाई न टाकता रीच डिलाईट पदार्थापासून मलाई पेढे केले जात होते. श्रावण सोमवारच्या निमित्ताने अन्न औषध प्रशासनाची मंदिर परिसरामध्ये ही कारवाई केली आहे.

श्रावण महिन्यानिमित्त त्रंबकेश्वरला भाविकांची संख्या अधिक वाढली आहे. याठिकाणी संपूर्ण देशभरातून भाविक हे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. परंतु डोळे झाकून प्रसादासाठी पेढे खरेदी करणाऱ्या भाविकांची काही भेसळयुक्त पेढे विक्रेत्यांकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त पेढे विक्रेत्यांवर ही कारवाई केल्याने भाविकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अन्य भेसळयुक्त पेढे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

पवईत एअर हॉस्टेसचा जीव घेणाऱ्या सफाई कामगाराने आयुष्य संपवलं, पोलीस कोठडीतच टोकाचं पाऊल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed