• Sat. Sep 21st, 2024
कौटुंबिक वादामुळे तरुण संतापला; रेल्वे पटरी गाठली, रुळावर मोठे दगड ठेवले, अन्…

सोलापूर: सोलापूर रेल्वे डिव्हिजनमधील मोडनिंब ते पंढरपूर दरम्यान रेल्वे रुळावर मोठमोठे दगड आढळले होते. ही बाब निदर्शनास आल्यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी आणि रेल्वे चालकांनी ताबडतोब एक्सप्रेस थांबवून रुळावरील दगड काढले होते. सोलापुरात रेल्वेचा मोठा घातपात घडवून आणण्याचे कृत्य कोणी केले याचा कसून तपास करण्यात आला. रेल्वे पोलिसांनी चोहोबाजूंनी तपास करत राज ऊर्फ बबल्या भारत रणपिसे (वय २२, रा. गुरसाळे, ता. पंढरपूर ,जि सोलापूर) याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
मोठ्या विश्वासानं कामावर ठेवलं; मोलकरणीचे धक्कादायक कृत्य, मालक पोलीस दरबारी, नेमकं काय घडलं?
संशयित आरोपीने पोलीस तपासात सांगितले की, हे सर्व कृत्य दारूच्या नशेत केले आहे. घरात भांडण झाले होते. राग कुणावर काढायचा म्हणून रेल्वे रुळावर मोठमोठी दगड ठेवले, अशी कबुली ताब्यात असलेल्या संशयित आरोपीने दिली आहे. मोडनिंब – पंढरपूर दरम्यान अज्ञात व्यक्तीने रेल्वे रुळांवर तीन ठिकाणी मोठे दगड ठेवून रेल्वेचा घातपात करण्याच्या हेतूने २५ ऑगस्ट रोजी कृत्य केले होते. आरोपींचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांनी आजूबाजूला असलेली घरे, दुकाने तसेच इतर ठिकाणी असलेल्या जवळपास २९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज घेऊन आरोपीचा शोध घेतला. रुळावर दगड ठेवणारी व्यक्ती ही आजूबाजूच्या गावातील असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी २९ सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत संशयित आरोपी बबल्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मोदींनी राष्ट्रवादी फोडली, पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या फुटीसाठी शरद पवारांनी भाजपला धरलं जबाबदार

राज ऊर्फ बबल्या भारत रणपिसे (वय २२, रा. गुरसाळे, ता. पंढरपूर ,जि सोलापूर) याने दारूच्या नशेत असे कृत्य केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे. अपघात घडवून आणण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले होते. राज ऊर्फ बबल्याच्या घरात भांडण झाले होते. बबल्याने रागाच्या भरात दारू प्राशन करून हे कृत्य केले. दारू पिऊन २५ ऑगस्ट रोजी मोडनिंब-पंढरपूर रेल्वे मार्गावर दगड ठेवून रेल्वेचा अपघात घडवून आणण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. आरपीएफ पोलिसांनी पुढील तपासासाठी टेम्भुर्णी पोलिसांकडे वर्ग केले आहे. करमाळा येथील न्यायालयात हजर करून पुढील कारवाई होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed