• Sat. Sep 21st, 2024
मामाकडे जाताना ट्रकने फरफटत नेलं, ‘स्वाभिमानी’च्या विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्याचा मृत्यू

कोल्हापूर : दुचाकीवरून मामाकडे निघालेल्या भाच्याचा अपघातात मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक देऊन फरफटत नेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षद सुनील बुद्रुक (वय २० वर्ष) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचा वाळवा तालुका अध्यक्ष होता. तरुणासोबत असलेला मित्र सुजल रामचंद्र बागणे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाट्याजवळ हा अपघात झाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हर्षद सुनील बुद्रुक (वय वर्ष २०) आणि त्याचा मित्र सुजल रामचंद्र बागणे (वय २०), (दोघे रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली) हे दोघे रविवारी दुचाकीवरून इंगळी येथील मामाकडे निघाले होते.

पत्नीची हत्या केल्यानंतर पतीला ब्रेन हॅमरेज, ठाण्याच्या माजी उपमहापौरांच्या कुटुंबात आक्रित
पुणे-बंगळुरू महामार्गावरून जाताना नागाव फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने हर्षदच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दोघेही काही अंतर फरफटत गेले. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला सुजल बाजूला फेकला गेला आणि तो गंभीर जखमी झाला तर हर्षदच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

आई गेल्यावरही बाबा खंबीर होते, पण… सुधीर मोरेंची आत्महत्या, निकटवर्तीय महिलेवर गुन्हा
दरम्यान अपघाताची माहिती मिळ‌ताच शिरोली एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना तत्काळ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच हर्षदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर ट्रक चालकास ताब्यात घेऊन पोलिसांनी ट्रक जप्त केला, तर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेयसीची हत्या करुन मृतदेह आंबोली घाटात टाकला, प्रियकराचा मित्र म्हणतो, मी तर फक्त त्याच्या…
हर्षद बुद्रुक हा तळसंदे येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तसेच तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचा वाळवा येथील तालुका अध्यक्षही होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण, आजोबा असा परिवार आहे.

चालकाचं नियंत्रण सुटलं, जालना-पुसद बस कोसळली; २२ प्रवासी जखमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed