जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांनी ताकद लावली असून अतुल बेनके यांच्या मतदारसंघात हे दोन्ही नेते या महिन्यात दौरा करणार आहेत. ३० सप्टेंबरला लेण्याद्री या ठिकाणी शरद पवार हे आदिवासी समाजाचा एक मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन आमदार अतुल बेनके यांनी केले आहे. तर, दुसरीकडे अजित पवार देखील ७ तारखेला जुन्नर मतदारसंघात असणाऱ्या ओझर या ठिकाणी ग्राहक पंचायतीचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन देखील अतुल बेनके यांनी केले आहे.
अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर अतुल बेनके यांच्यासमोर संभ्रम होता की अजित पवार यांच्यासोबत जावं ही शरद पवार यांना साथ द्यावी. या संभ्रमावस्थेत अतुल बेनके यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता जुन्नर मतदारसंघात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांचे मिळावे आयोजित करत पुन्हा एकदा अतुल बेनके यांनी आपली भूमिका संभ्रमातच ठेवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील आमदारासाठी दोन्ही पवारांनी आता कंबर कसली आहे
पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्लामध्ये अजित पवार यांचा होल्ड राहणार की शरद पवार हा आपला करिष्मा दाखवणार यासाठी दोन्ही पवार जोरदार तयारीला लागले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुणे जिल्ह्यातल्या विकासकामांच्या आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे शरद पवार हे पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी सातत्याने शहरात आणि जिल्ह्यात दौरे करून मिळावे घेत आहेत. त्यामुळे जुन्नरमध्ये दोन्ही पवारांचे दौरे हे एकाच आमदारांनी आयोजित केल्यामुळे एक नवा संभ्रम कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.