काय आहे प्रकरण?
या प्रकरणी हॉस्पिटलचे डॉ. बद्री नामदेव मोरे यांनी तक्रार दिली. मोरे, स्वप्नील शांताराम गायकवाड, विश्वास दिलीपराव पवार आणि महिला कर्मचारी रात्रपाळीस होते. चक्कर येत असल्याने शहनाज शेख यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, सात ते आठ जणांची गर्दी झाली. नातेवाईकांना बाहेर थांबण्यासाठी सांगितल्यानंतर नातेवाइकांनी आरडाओरड सुरू केली. त्यांना समजाविण्यासाठी डॉ. मोरे आणि इतर कर्मचारी गेले असता, या सात ते आठ जणांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच डॉक्टरांनी स्वत:ला वाचविण्यासाठी हातात खुर्ची धरून ठेवली असता, रूग्णाच्या नातेवाइकाने खुर्ची हिसकावून डॉक्टराच्या खांद्यावर मारली. नंतर जमावाने इसीजी मशीन, ट्रॉली, टेबल, काऊंटरची काच फोडून नुकसान केले.
हमीद भिकन शेख व सात जणांविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक निशिगंधा नानासाहेब म्हस्के करीत आहेत.