• Sun. Jun 14th, 2026
    डॉ. मनीषा जेजुरकरांनी जीव दिला,  मानसोपचार तज्ज्ञ नवऱ्यावर गुन्हा, डॉक्टर महिलेशी जवळीक असल्याचा आरोप

    Dr Manisha Jejurkar Death Case : हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या आणि मानसिक व्याधींवर मात करायला शिकवणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाच्याच पत्नीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नाशिक : मानसिक आजारी असलेल्या रुग्णांना सावरणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ ाच्याच घरात एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयमधील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या पत्नी आणि आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी गंगापूररोड येथील राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. शुक्रवार ०६ मार्च रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आला. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नेमकं काय घडलं?

    डॉ. मनीषा जेजुरकर यांनी घरात गळफास घेतल्याचे लक्षात येताच त्यांच्या भावाने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती आहे. मनिषा जेजुरकर यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती डॉ. निलेश जेजुरकर यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Maharashtra TimesCrime News : कॉलेज विद्यार्थिनीच्या खोलीतच 25 वर्षीय बँक कर्मचाऱ्याने जीव दिला, तरुणीचा आरडाओरडा, निंबाळकर कुटुंब शोकसागरात
    डॉ. नीलेश जेजुरकर हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हजारो रुग्णांना नैराश्यातून बाहेर काढणाऱ्या आणि मानसिक व्याधींवर मात करायला शिकवणाऱ्या तज्ज्ञाच्याच पत्नीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले.

    गेल्या काही वर्षात पहिल्या उद्घाटनाला अजितदादा नाहीत, मुरलीधर मोहोळांनी आठवण सांगितली

    माहेरच्या लोकांचे गंभीर आरोप

    डॉ. मनीषा जेजुरकर यांनी जीव देण्यामागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नसले तरी आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सरकारी डॉक्टर असलेल्या डॉ. जेजुरकर यांच्यावर पत्नी मनीषा यांच्या माहेरच्या नातेवाईकांकडून गंगापूररोड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
    Maharashtra TimesCrime News : स्वतःला वाचवताना टॅक्सी चालकाचा जीव घेतला, बॉडी पुण्यात टाकली; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला टिटवाळ्यात अटक

    डॉक्टर महिलेशी जवळीक

    नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, “गंगापूररोड येथील संशयित डॉ. निलेश जेजुरकर यांची २०२१ पासून ए. एच. ओ. डी. असलेल्या डॉक्टर महिलेसोबत जवळीक होती. घरातील सर्व बारीक सारीक गोष्टी सांगून, तिच्याप्रमाणे घरात वागून, डॉ. मनिषा यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन मानसिक त्रास देत तिला जीव देण्यास प्रवृत्त केले” असे तक्रारीत नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणांत पोलिस तपासात काय समोर येते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा