• Mon. Nov 25th, 2024

    बँकेतल्या कामानंतर जावई सासरी गेला, जुन्या वादातून अनर्थ घडला, एक संशय अन् गूढ उलगडलं

    बँकेतल्या कामानंतर जावई सासरी गेला, जुन्या वादातून अनर्थ घडला, एक संशय अन् गूढ उलगडलं

    जयंत सोनोने, अमरावती : जावई आणि सासरच्या लोकांमध्ये वाद झाला होता. त्या वादातून सासरच्या लोकांनी जावयाचा खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना साधारपणे अडीच महिन्यांपूर्वी म्हणजेच १४ जून रोजी घडली होती. पत्नीनं पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरु केल्यानंतर धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सासरच्यांनी जावयाची मान पिरगळून हत्या केली असल्याचं समोर आलं. ही घटना १४ जून रोजी चिखलदरा ठाण्याच्या हद्दीतील चुनखडी येथे घडली होती. आपल्या पतीला माहेरच्या लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यातूनच पतीची हत्या करण्यात आल्याचा संशय पत्नीने त्यावेळी व्यक्त केला होता. सदर प्रकरणात पोलिसांनी अडीच महिन्यानंतर चौकशी अहवालावरून सासरच्या चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

    संजू चन्नू जामुनकर (४०) रा. मरीता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सोनाजी लोफे धिकार, भाकलू सोमा धिकार, केंडे सोमा धिकार सर्व रा. चुनखडी आणि मातिंग भय्या सेलूकर रा. हतरु यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    क्रूरता! घरकामासाठी आणलेल्या ७ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले, शरीराला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर
    पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संजू जामूनकर आणि त्याची पत्नी बुकली यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादात संजूने पत्नी बुकलीला मारहाण केली होती. ही बाब बुकलीने माहेरच्यांना सांगितली होती. त्यामुळे माहेरच्यांनी तिला माहेरी नेले होते. त्यानंतर आपसातील वाद मिटले असल्याने संजू याने पत्नीला सासरी जाऊन घरी आणले. त्यावेळेस माहेरच्यांनी तिला नेण्यास विरोध केला होता. तसेच पुन्हा मारहाण केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती.
    Monsoon 2023 : गुड न्यूज,सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, IMD चा नवा अंदाज, राज्यासह मराठवाड्याला दिलासा
    दरम्यान, १३ जून रोजी संजू जामूनकर हा सेमाडोह येथे बँके केवायसी करण्यासाठी गेला होता. तेथून गावी जाण्यासाठी वाहन नसल्याने तो चुनखडी येथील सासरी गेला. रात्री तो मुक्कामी होता. त्यावेळी सासरच्यांनी आपल्या मुलीला जबरदस्ती घेऊन गेल्याच्या कारणावरून संजू जामूनकरला मारहाण केली. त्याची मान पिरगळून हत्या केली होती. चौकशी अहवालातून ही बाब समोर आल्यावर पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    Mumbai Local: मोठी बातमी: लोकलने CSMT स्थानकातील सिग्नल ओलांडला; गाड्या २० मिनिटे उशिरा, चौकशी होणार

    कोल्हापुरात दारुबंदी ठरावावरून ग्रामसभेत दोन गटात राडा, महिलांना धक्काबुक्की

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *