मुंबई : कल्याण-सीएसएमटी लोकलने आज दुपारी ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक चारवर सिग्नल ओलांडला. या घटनेमुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान सिग्नल ओलांडलेल्या मोटारमनला लोकलमधून उतरवण्यात आले आहे. या प्रकरणी मध्य रेल्वेने चौकशी घोषित केली आहे. सध्या लोकल फेऱ्या १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत आहेत.
लोकल फेऱ्या उशिराने धावत असल्याने सायंकाळच्या सुमारास कामावरून घरी परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ही वाहतूक लवकरच सुरळीत होईल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, काल रक्षाबंधन साजरा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या भावा-बहिणींनाही मध्य रेल्वेच्या लोकल खोळंब्याचा सकाळ-संध्याकाळी त्रास सहन करावा लागला होता. बुधवारी सकाळी नेरळ ते वांगणीदरम्यान मालगाडीचे कपलिंग तुटल्याने सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा ठप्प झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कर्जत स्थानकात सिग्नल बिघाड झाला होता. यामुळे सकाळी आणि सायंकाळी झालेल्या बिघाडामुळे रक्षाबंधन साजरे करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.