• Sat. Sep 21st, 2024

चंद्रपूरवर शिवकृपा! पार्वती मंदिर परिसरात खोदकामादरम्यान सापडले मराठाकालीन प्राचीन शिवलिंग

चंद्रपूरवर शिवकृपा! पार्वती मंदिर परिसरात खोदकामादरम्यान सापडले मराठाकालीन प्राचीन शिवलिंग

चंद्रपूर: श्रावण मासाचे धार्मिक महत्त्व फार मोठे आहे. शंकर देवांना अतिशय प्रिय असलेला हा महिना. शिवभक्त हा संपूर्ण महिना शिवभक्तीत घालवीतात. श्रावण मासातील आजच्या पौर्णिमेलाच चंद्रपूरातून शिवभक्तांना सुखाविणारी घटना घडली. जिल्हातील चिमूर तालुक्यात येणाऱ्या नेरी येथे पार्वती मंदिर परिसरात खोदकामा दरम्यान दोन प्राचीन शिवलिंग सापडलीत. हे शिवलिंग मराठाकालीन असल्याचे इतिहास अभ्यासक अशोक सिह ठाकूर यांनी सांगितले. एन श्रावण मासात शिवदर्शन झाल्याने भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.

चिमूर तालुक्यातील नेरी येथे हेमाळपंथी मंदिर आहे. राक्षस मंदिर म्हणुनही हे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिर परीसरात असलेल्या पार्वती मंदिरा समोर सभा मंडपासाठी खोदकाम करण्यात आले. मात्र पुरातत्व विभागाने काम थांबवण्याची नोटीस दिली. त्यामुळे काम थांबवण्यात आले. खोदकाम केलेले खड्डे आज ( बुधवार ) बुजविण्याचा कामाला सुरुवात करण्यात आली. खड्डे बुजवित असताना आजूबाजूची माती ओढताना दोन प्राचीन शिवलिंग सापडलेत. यातील एक शिवलिंग काळ्या दगडात कोरलेला आहे. तर दुसरा पांढऱ्या दगडातील आहे. हे दोन्ही शिवलिंग मराठा कालीन असल्याचे इतिहास अभ्यासक अशोक सिंग ठाकूर यांनी सांगितले.

नवस पूर्ण झालं की श्रद्धेने ठेवतात शिवलिंग…

शंकर देवाकडे एखादे नवस बोलले. ते नवस पूर्ण झालं कि श्रद्धेने मंदिर परिसरात भाविक शिवलिंग ठेवत असायचे. तशी प्रथा होती. एखाद्या भक्ताने ठेवलेले हे शिवलिंग असावे, असे ठाकूर यांनी सांगितले.

या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे नेरी गाव…

प्राचीन वास्तुकलेचा उत्कृष्ठ नमुना असलेले हेमाळपंथी (राक्षस)शिव मंदिर नेरी गावात आहे.हे मंदिर भारतिय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. या परिसरात अनेक पुरातत्व अवशेष सापडतात.

शेतात मिळाली मूर्ती अन मंदिर उभे झाले…

सत्तर वर्षा पूर्वी एका शेतात शेतकर्‍याला एक मूर्ती आढळली होती. ती मूर्ती पार्वतीदेवीची होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे हस्ते १ जानेवारी १९६५ मध्ये हेमाळपंथी मंदिराच्या जवळपास पन्नास मीटर अंतरावर असलेल्या शिवमंदिरा पुढे प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्वतीमंदिरात दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा केला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed