• Mon. Nov 25th, 2024
    गुन्हेगाराला पकडायला जाताच दगडफेक सुरु, पोलिसी खाक्या दाखवला, पोलिसांकडून आरोपीचा करेक्ट कार्यक्रम

    कल्याण: आंबिवली येथील इराणी वस्तीत मुंबईतील पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबई येथील डीएन नगर पोलीस एका गुन्ह्यातील फरार आरोपीला ताब्यात घेण्यासाठी आले होते. यावेळी पोलिसांवर दगडफेक देखील झाली. मात्र पोलिसांनी हल्ला परतवून लावत आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला अटक केली आहे. फिरोज खान असे अटक आरोपीचे नाव आहे. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
    तरुणाला संपवून चार जण गायब झाले, ८ वर्षे गुंगारा दिला, टॅटू हाती लागला अन् आरोपीला बेड्या, सिनेस्टाइल थरार
    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई विभागातील अंधेरीमध्ये एका व्यक्तीला तोतया पोलिसांनी गंडा घातला होता. ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती. डीएननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चोरांचा शोध सुरू केला. त्यातील एक आरोपी फिरोज खान हा सराईत गुन्हेगार असून तो कल्याण येथील आंबिवलीतील इराणी वस्तीत राहतो. पोलिसांना त्याला पकडण्यासाठी रविवारी सापळा रचला. वस्तीत आधी एक महिला आली. ती महिला बुरखा घालून आली होती. ती पोलीस होती. तिच्यासोबत देखील काही पोलीस होते. फिरोज कुठे दिसतोय का हा शोध सुरू होता. अचानक फिरोज एका सलूनमध्ये दाढी करताना दिसून आला. या पोलिसाने वस्तीबाहेर थांबलेल्या पोलिसांना माहिती दिली.

    दहिहंडी उत्सवावरून शिंदे अन् ठाकरे गट पुन्हा भिडणार?; परवानगी देणाऱ्या पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप

    त्यानंतर पोलीस कोणत्याही प्रकारची पोलीस जीप न वापरता एक शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी व्हॅन घेऊन आले. त्यांनी आरोपीला पकडले. या दरम्यान आरोपीच्या लोकांकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हा हल्ला परतवून लावत आरोपीला कोणतीही पळून जाण्याची संधी न देता त्याला इराणी वस्तीतून घेऊन गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. फिरोज याच्या विरोधात ३५ गुन्हे दाखल आहेत. गेल्या २० वर्षांपासून या इराणी वस्तीत चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस जातात. तेव्हा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला जातो. एकदा तर पोलिसांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. अशाच एका घटनेत पोलिसांना बचावासाठी गोळीबार करावा लागला. त्यात दोन इराणींचा मृत्यू झाला होता. अखेर इराणी वस्तीतील चोरट्यांची दहशत कधी थांबणार? असा प्रश्न केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed