• Sat. Sep 21st, 2024
डोळ्यात अश्रू, देवाकडे माफी, सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना

अहमदनगर : सगळीकडे निर्माण झालेल्या दृष्काळसदृश वातावरणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि कोपरगावातील मुस्लिम बांधवांनी रविवारी पावसासाठी इदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून ईश्वर अल्लाकडे पावसासाठी प्रार्थना केली. कोपरगाव येथील मदरशातील मौलाना तोसिफ यांनी यावेळी राज्यात सर्वत्र पाऊस पडावा, यासाठी अल्लाकडे प्रार्थना करताना म्हटले की, “ईश्वर,अल्लाह समस्त मानव जातीसाठी, पशू- पक्ष्यांकरिता जिथे जिथे पाऊस नाही तेथे फायदा देणारा पाऊस पडू दे.समस्त जातीला त्रास होईल इतकाही त्रास देऊ नको, आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हा सर्वांना माफ कर, आम्हा सर्वांवर दया कर.आमचे शेतकरी चिंतेत आहे आम्हाला आणि मुक्या प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही,नफा देणारा भरपूर पाऊस पडू दे, प्रत्येक मनुष्य आकाशाकडे डोळे लावून आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने होत आहेत. हे ईश्वरा समस्त जिवांवर कृपा कर” अशी आर्तपणे प्रार्थना करत असताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.

तसेच भारताची प्रगती आणि देशात शांतता नांदावी यासाठी देखील प्रार्थना करण्यात आली.यावेळी शिर्डी येथे मौलाना मन्सूर, मौलाना अन्वर, मौलाना मुबीन,मौलाना जाकीर, मौलाना अमजद, तर कोपरगाव येथे मौलाना अब्दुल हमीद राही, मौलाना आसिफ आदींसह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात पुण्याचा डंका! मृणाल गांजाळे यांनी कोरले नाव, ठरल्या राज्यातील एकमेव शिक्षिका

तो प्रार्थना वाया जाऊ देणार नाही

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारपेठेत आर्थिक मंदी आहे. आज आम्ही नफा देणाऱ्या पावसासाठी प्रार्थना केली. मुस्लिम बांधवांचा अल्लाहवर विश्वास आहे. तो मुस्लिम समाजाची प्रार्थना वाया जाऊ देणार नाही. कारण तो परम दयाळू, परम कृपाळू आहे. आपल्या भक्तांना निराश करणार नाही, अशा भावना उपस्थित मुस्लिमांनी व्यक्त केल्या.

Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल

अनेकांच्या डोळ्यात अश्रू

कृपाळू ,दयाळू ,ईश्वर अल्लाहकडे पावसासाठी प्रार्थना करताना मुस्लिम मौलवींनी मानवाच्या चुका आणि आम्हा कडून घडत असलेले पाप याची शिक्षा मुक्या प्राण्यांना आणि सर्वांना नको देऊ हे ईश्वरा आमच्यावर दया कर असे म्हणताच अनेक मुस्लिम बांधवांच्या डोळ्यात अश्रू तरळले, यावेळी सर्वांनी आपले हाथ पुढे घेउन देवाकडे ध्यान लावून १ तास प्रार्थना केली.

Chhagan Bhujbal:येवल्यातील सभा ते तेलगी प्रकरणात गृहमंत्रिपदाचा राजीनामा, छगन भुजबळांचे शरद पवारांना थेट सवाल

सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीत भाविकांची साई दर्शनासाठी अलोट गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed