• Tue. Nov 26th, 2024
    आई-वडिलांकडून शिक्षणाचं बाळकडू; अन् इस्त्रोमध्ये निवड, कोकणपुत्राची चांद्रयान ३ मोहिमेत भूमिका

    रत्नागिरी: थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे सर्वोच्च स्थान निर्माण करण्यामध्ये चांद्रयान ३ ही मोठी महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी ठरली. यामुळे भारताची शान आणखी उंचावली आहे. चांद्रयान ३ या मोहिमेत कोकणकन्या अश्विनी विलास जांभळीकर या कोकण कन्येचाही सहभाग होता. आता या मोहिमेत कोकण सुपुत्र पार्थ याचाही सहभाग होता, अशी माहिती मिळाली आहे. या मोठ्या मोहिमेत मूळचा कोकणच्या असलेल्या सुपुत्राने सहभाग घेतला होता.
    चांद्रयान ३ मोहीम यशस्वी; नांदेडच्या लेकीने संधीच सोनं केलं, बजावली ‘अशी’ भूमिका
    मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात कुंभारखाणी गावचा सुपुत्र पार्थ सुर्वे यांनी चांद्रयान ३ या राष्ट्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेत उल्लेखनीय सहभाग घेतला. गेली पाच वर्षे तो इस्त्रोमध्ये कार्यरत असून त्याला चांद्रयान ३ या मोहिमेतही सहभाग घेण्याची मोठी संधी मिळाली. या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यात सहभागी असलेला हा पहिलाच युवक ठरला आहे. पार्थ सुर्वे यांना शिक्षणाचा वारसा हा त्यांच्या आई-वडिलांकडूनच मिळाला आहे. पार्थ सुर्वे याचे सगळे शिक्षण हे मुंबईत झाले. पार्थ हे मुंबई अंधेरी येथील सेंट डॉमिनिक सॅव्हियो स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. भवन्स कॉलेज अंधेरी येथून बीटेक एरोस्पेस अभियांत्रिकी ही पदवी घेतल्यानंतर IIST त्रिवेंद्रम, VSSC, ISRO त्रिवेंद्रम येथे ५ वर्षे कार्यरत आहेत.

    भगवी शाल अन् पुष्पगुच्छ देत सन्मान; वाशी टोलनाक्यावर अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा

    पार्थ आता MTch ची तयारी करत आहेत. कोकणात आपल्या मूळ गावी शिमगोत्सव आणि गणेशोत्सव कालावधीत हे कुटुंब आवर्जुन आपल्या गावी येतात. संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी या आपल्या मूळ घरी त्यांचे चुलते आणि अन्य कुटुंब असते. या सगळ्या व्यस्त वेळातही आजही या कुटुंबाची गावाजवळ असलेली नाळ घट्ट आहे. पार्थ यांच्या या चांद्रयान ३ मोहिमेची सहभागामुळे ग्रामस्थांसाठीही विशेष अभिमानास्पद बाब ठरली आहे, अशी प्रतिक्रिया गावचे उपसरपंच अनिल सुर्वे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ जवळ बोलताना दिली आहे. वडील अजित हे सुद्धा सायन्स चे विद्यार्थी, Bsc पर्यंत पदवी घेतल्यानंतर त्यांनी नवी मुंबई येथील नोसील या मोठ्या कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर आई माधवी सुर्वे या महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण आयुक्त विभागाच्या सहाय्यक पदावर कार्यरत आहेत.
    अभिमानास्पद! चांद्रयान-३ चं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग, मोहीम यशस्वी करण्यात कोकणकन्येचा हात
    अजित सुर्वे यांचा कोकणातील अजित गणपतराव सुर्वे, गाव कुंभारखाणी यांचे चिरंजीव कु. पार्थ हा चंद्रावर गेलेले चांद्रयान ३ इस्त्रो या शास्त्रज्ञांच्या ग्रुपमध्ये होता. या मोहिमेचा आणि इस्त्रो टीमचा आम्हाला अभिमान आहेच पण आपल्या विभागातील एका तरुणाने यात योगदान दिल्याने आमचा आनंद अधिक झाला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत कुटुंबाचेही अभिनंदन करणारी अजय यादव यांनी यासंबंधीची पोस्ट फेसबुकवरून शेअर केली आहे. मूळचा कोकण सुपुत्र असलेल्या पार्थ सुर्वे यांनी पुन्हा एकदा कोकणाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे केलं आहे. मला वाचन, प्रवास आणि छायाचित्रण विशेषतः खगोल छायाचित्रणाची आवड आहे. मला १२ वी मध्‍ये १ली रँक आली होती. मी अभियांत्रिकी महाविद्यालय आणि इस्रोमध्ये अनेक तांत्रिक परिषदांना उपस्थितीती लावली आहे. मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत, असे पार्थने सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed