• Sat. Sep 21st, 2024

खुनाच्या घटनेवरुन सिडकोत रिअ‍ॅक्शन; वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुले ताब्यात

खुनाच्या घटनेवरुन सिडकोत रिअ‍ॅक्शन; वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुले ताब्यात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक / सिडको : तीन दिवसांपूर्वी सिडकोतील शिवाजी चौकात इन्स्टाग्राम व्हिडीओवरून झालेल्या वादातून तरुणावर सपासप वार करून खून केल्याची घटना घडली होती. याप्रकारामुळे मृताच्या संतप्त झालेल्या मित्रांनी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. शुक्रवारी (दि. १८) मध्यरात्री सात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांना अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाच्या घटनेवरून आलेल्या या ‘रिअॅक्शन’मुळे परिसरात पोलिसांचा वचक निर्माण होण्याची अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

काय प्रकरण?

सिडकोतील अचानक चौकात रात्री चारचाकीसह दुचाकीवर दगड घालून तोडफोड करण्यात आली. त्यावेळी ‘आमच्या भावाचा मर्डर करता का’ या शब्दाचा वापर संशयितांनी केल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून समोर आले आहे. दुचाकी फोडल्यानंतर खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या एका कर्मचाऱ्यालाही मारहाण करून संशयितांनी त्याच्याकडील पैसे काढून घेतले. नागरिकांनाही शिवीगाळ करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न संशयितांनी केला. त्यामुळे अंबड पोलिसांत नागरिकांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. गुरुवारी (दि.१८) शिवाजी चौक भाजी बाजारात संदीप आठवले या तरुणाचा खून झाला. त्याचा व्हिडीओ तयार करून दहशत निर्माण करणाऱ्या मुख्य संशयितासह इतर साथीदारांना पोलिसांनी अटक केली. या घटनेनंतर मृत संदीपशी जवळीक असलेल्या तरुणांनी वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे. मुळात, पोलिसांनी खुनाच्या घटनेला ‘रिअॅक्शन’ म्हणून टवाळखोरांना चोप दिला. मात्र, त्यानंतरही नशेत संशयितांनी वाहने फोडण्याचे धाडस दाखविल्याने रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
संशयानं संसाराची राखरांगोळी; रात्रीत भयंकर घडलं, पत्नीला संपवून पती पोलीस चौकीत हजर
दबंग अधिकारी साइड ट्रॅक!

दीड महिन्यापूर्वी अंबड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकात असलेल्या दबंग सहायक निरीक्षकांनी परिसरात टवाळखोरांसह गुन्हेगार व संशयितांवर चांगला वचक निर्माण केला होता. त्यांनी अनेकांना ‘खाकी’चा हिसका दाखविल्याने सराईतांना ‘पळता भुई थोडी झाली’ होती. किंबहुना त्यांच्या ‘ठोक कार्यक्रमा’मुळे काही संशयितांनी हद्दीतून पोबारा केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच नवनियुक्त पोलिस निरीक्षकांनी गुन्हे शोध पथकात बदल केल्याने ‘त्या’ दबंग अधिकाऱ्याला साइड ट्रॅक करण्यात आले. त्यामुळे सराईतांनी परिसरात पुन्हा उपद्रव वाढविल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed