• Sat. Sep 21st, 2024

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला ‘स्पीड’ मिळणार, अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, काय घडलं?

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला ‘स्पीड’ मिळणार, अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये, काय घडलं?

म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे,अहमदनगर आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी जोडणारा महत्वकांक्षी पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला ‘स्पीड’ मिळणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या मान्यतेसाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रस्तावाला गती देण्याकरिता आता महारेल कंपनीलाच प्रस्ताव देण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. महारेलद्वारे हा प्रकल्प साकारण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने या प्रकल्पाला आता गती मिळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. राज्यमंत्रिमंडळाच्या येत्या बैठकीत त्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळावी, अशी शक्यता होती. मात्र, या प्रकल्पाच्या प्रस्तावाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठविले. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याने या प्रकल्पाबाबत शंका निर्माण होऊ लागली. हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने की महारेलने करावा याबाबत चर्चाविनिमय सुरू होता.

दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा सत्तेत सहभाग झाला. त्यानंतर त्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील निगडीत अनेक प्रकल्पांचा आढावा घेण्यास सुरूवात केली. त्यानुसार, पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्र टाइम्सने या प्रकल्पाबाबत वारंवार वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा घेतला होता.

असा आहे प्रकल्प

– पुणे-नाशिकमधील अंतर : २३५ किलोमीटर

– प्रवासाचा कालावधी : पावणे दोन तास

– प्रकल्पाचा अंदाजित खर्च : १६,०३९ कोटी रुपये

– प्रस्तावित स्टेशन : २०

भारत आणि आयर्लंडच्या आठव्या सामन्यांत हे पहिल्यांदाच घडलं, तिसऱ्या सामन्याचा निकाल लागला…

पुणे-नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता मिळाल्याची घोषणा झाली होती. मात्र, अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नाही. पुणे, अहमदनगर, नाशिक या तिन्ही जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रकल्पाला तत्त्वत: मान्यता दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सुधारित आराखडा ‘महारेल’मार्फत सादर करण्यात आला होता. तरीही अद्याप केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेची मोहोर उमटलेली नाही.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचे भूसंपादनासह पुढील सर्वच काम काही महिन्यांपासून थंडावलेले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा या प्रकल्पात लक्ष घातले होते.
Chandrayaan-3 : चांद्रयान ३ ची मोहीम फत्ते, भारतानं इतिहास रचला, इस्त्रोचं स्वप्न पूर्ण, चंद्रावर पहिलं पाऊल

नाशिक-पुणे हा २३२ किलोमीटरचा रेल्वेमार्ग नाशिकसह सिन्नर तालुक्यातील एकूण २२ गावांमधून जाणार आहे. सिन्नरमधील १७, तर नाशिक तालुक्यातील पाच गावांचा त्यामध्ये समावेश आहे. या द्रुतगती रेल्वेमार्गासाठी काही गावांत जमिनींचे संपादनही सुरू झाले. जिरायत, हंगामी बागायत आणि बारमाही बागायत जमिनीसाठी प्रतिहेक्टरी दर प्रशासनाने जाहीर केले. परंतु, त्यानंतर ही प्रक्रिया थांबलेली होती. महाविकास आघाडीची सत्ता गेली आणि रेल्वेमार्गाच्या कामाला ब्रेक लागला. परंतु, अजित पवार सत्तेत सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाल्यामुळे या रखडलेल्या प्रकल्पाला पुन्हा गती मिळेल अशी आशा आहे.
इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळले, दोघांचा जागीच मृत्यू ४ जखमी, कारण ठरलं तिसऱ्या मजल्यावरील ते काम

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साई चरणी लीन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed