• Mon. Nov 25th, 2024
    खासदारांच्या नावे बनावट लेटरपॅड, सह्या करून १० कोटींची कामे मंजूर, जिल्हा परिषद सदस्याला बेड्या

    पालघर: पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर बनावट सह्या करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामे मंजूर करत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य, जव्हार अर्बन बँकेचे चेअरमन हबीब शेख यांना याप्रकरणी पालघर पोलिसांनी अटक केली आहे.
    भाजप आमदारांच्या नावाने फेक अकाऊंट; महिलांना पाठवले संदेश,पोलिसांनी ‘असा’ केला करेक्ट कार्यक्रमपालघर जिल्ह्यातील मोखाडा विभागातील मोखाडा-खोडाळा विहीगाव राज्यमार्ग ७८ रस्त्यासाठी खासदार यांनी मागणी केल्यानुसार शासनाकडून १० कोटीच्या निधीची मंजुरी मिळाली होती. या कामाच्या मंजुरीकरीता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खासदारांनी विचारणा केली असता मंजूर झालेल्या कामाचा पाठपुरावा आणि त्याकरता लागणारे कागदपत्रे जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख यांनी सादर केल्याची माहिती खासदारांना मिळाली. खासदार राजेंद्र गावित यांनी अधिक माहिती जाणून घेतली असता शेख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही कामासाठी सादर केलेली कागदपत्रे ही बनावट असल्याचे समोर आले.

    जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीची कारवाई, २५० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट

    हबीब शेख यांनी बनावट लेटरहेड तयार करून त्यावर राजेंद्र गावित यांच्या बनावट सहीचा चुकीचा वापर केला. त्यामुळे लोकप्रतिनिधींची आणि सरकारची दिशाभूल करून शासनाची १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावित यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाने बनावट लेटर पॅड तयार करून त्यावर बनावट सह्या करून तब्बल दहा कोटी रुपयांची कामे मंजूर केल्याप्रकरणी खासदार राजेंद्र गावीत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने हबीब शेख यांना अटक केली आहे. हबीब शेख यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *