• Mon. Nov 25th, 2024

    मुख्यमंत्री बदलाची चर्चा, पालकमंत्रिपद अन् खरी राष्ट्रवादी कोणाची? भुजबळ रोखठोक बोलले!

    मुख्यमंत्री बदलाची चर्चा, पालकमंत्रिपद अन् खरी राष्ट्रवादी कोणाची? भुजबळ रोखठोक बोलले!

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत कोण नाराज आहे, हे मला माहीत नाही. माझ्याकडे कामच एवढे आहे की, नाराजी व्यक्त करायला देखील वेळ मिळत नाही, असे सांगत पालकमंत्री ठरविण्याचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजीबाबत दिले आहे. पंधरा दिवसात मुख्यमंत्री बदलतील या अफवा असल्याचा दावाही भुजबळांनी केला आहे.

    नाशिकमध्ये पत्रकारांशी भुजबळ बोलत होते. महायुतीत तीन पक्ष असले तरी, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा तसेच प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. परंतु, नाशिक जिल्हा हा भुजबळांचा बालेकिल्ला राहिला असल्याचे अन्य पक्षांकडून सुरू असलेल्या बैठकांबाबत स्पष्ट केले आहे. राज्यात येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री बदलेल, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून केला जात आहे. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बदलणार नाहीत, तेच कायम राहणार आहेत, या अफवा असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे.

    शरद पवारांकडून धनंजय मुंडेंच्या बंदोबस्ताची तयारी, अजितदादांकडून धनुभाऊंना तोडीस तोड जबाबदारी

    रिसॉर्टमध्ये दादा भुसेंसोबत गुप्त भेट? चर्चांना उधाण येताच आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    खरी राष्ट्रवादी आमचीच

    उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभेत पक्षाचे बळ खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी उभे केले आहे. परंतु, महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीचा भाग म्हणून ते करणे त्यांना आवश्यक आहे, असे मत भुजबळांनी मांडले आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे पक्षाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी मिळाली आहे. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed