• Sat. Sep 21st, 2024

बाळूमामांच्या नावानं चांगभलं! अधिक मासातील अमावस्या, बेलाटीत भाविकांची तुफान गर्दी

बाळूमामांच्या नावानं चांगभलं! अधिक मासातील अमावस्या, बेलाटीत भाविकांची तुफान गर्दी

सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथे अधिक मासाच्या अमावस्येनिमित्त संत श्री बाळूमामांच्या दर्शनासाठी हजारो नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. अधिक मासाच्या अमावस्येनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने एसआरपीएफचे सहाय्यक समादेशक नानासो मासाळ यांनी सपत्निक बाळुमामांचे दर्शन घेतले.

यावेळी बाळूमामा मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्रीराम बापू पाटील यांनी एस आर पी चे सहायक समादेशक नानसो मासाळ यांची सपत्नीक कांबळा आणि बाळुमामांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. सायंकाळची महाआरती नानसो मासाळ यांच्या हस्ते करण्यात आली. अधिक मास अमावस्या असल्याने सोलापूर जिल्हासह इतर जिल्ह्यातील भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

नानासो मासाळ म्हणाले की, बाळूमामांच्या आशिर्वादाने आणि त्यांच्या कृपेने मी कॉन्सटेबल ते डीवायएसपी झालो. तसेच यापुढे देखील बाळूमामांचा मला आशिर्वाद राहणार आहे असा विश्वास व्यक्त केला तसेच बाळूमामांच्या आशिर्वादासोबतच त्यांच्या मेंढ्यांचेदेखील मला दर्शन झाले त्यामुळे माझ्यासाठी आजचा दिवस भाग्याचा आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

अमावस्येमनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामांचे मूळ गाव असलेल्या आदमापूर येथून पाच हजार मेंढ्या दर्शनासाठी बेलाटी येथे आणण्यात आल्या होत्या. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

शेतीत नव्या प्रयोगाचा ध्यास; नोकरीला केले बाय-बाय, MBA शिकलेला प्रफुल्ल पेरु बागेतून मिळवणार १० लाखांचे उत्पन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed