या बाबत अधिक माहिती अशी की, नीलिमा चव्हाण स्टेट बँकेत दापोली शाखेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. बँकेचा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव घातला होता. नीलिमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलूनकामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती. यामुळेच ती चिंताग्रस्त झाली होती. कामाच्या ताणामुळे ती घरामध्ये व्यवस्थित जेवत नसल्याबाबत देखील फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली असून संताप व्यक्त होत आहे.
उच्चविद्याविभूषित असलेल्या नीलिमा चव्हाण हिने टोकाचे पाऊल उचलल्याने विविध तर्कवितर्क व घातपाताचा संशय यापूर्वी व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आता या मागची नेमकी कारणं समोर आली आहेत. या सगळ्या प्रकरणावरून नाभिक समाज व विविध सामाजिक संघटनांनी ही आक्रमक भूमिका घेतली होती. नीलिमाच्या मृत्यूप्रकरणाचा सगळा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आता या प्रकरणातील मोठी खळबळजळक माहिती समोर आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या आठ टीम तपास करत होत्या याबद्दल जवळपास १०० हून अधिक व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. दाभोळ पोलीस ठाण्याकडून स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती. दाभोळ सागरी पोलीस ठाण्यात आ.मृ. रजि क्र_०४/२०२३ CRPC कलम १७४ प्रकरणी भा.द.वि.सं चे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
०१ ऑगस्ट २०२३ रोजी दाभोळच्या खाडीत मृत अवस्थेत मिळालेल्या कु. नीलिमा चव्हाण हिच्या अकस्मात मृत्यूप्रकरणी दाभोळ पोलीस स्टेशन अधिक तपास करीत होते. तसेच आजवरच्या तपासात प्रथम दर्शनी खालील बाबी निष्पन्न झाल्या होत्या. नीलिमा हिच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी सामान्य व विशिष्ट रासायनिक चाचणी अंती कोणत्याही प्रकारचे विष दिसून आले नसल्याचे तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे. तसेच मृत्यूचे अंतिम कारण हे “Asphyxia due to drowning” असे नमूद केले आहे.
आत्तापर्यंत पोलिसांमार्फत चिपळूण, खेड व दापोली येथील एसटी स्थानक, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आलेली आहे. या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असताना दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी चिपळूण पोलीस ठाणे येथून ००/२०२३ नंबर ने दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर १७/२०१३ भा.द.वि. संहिता चे कलम ३०६ अन्वये आत्महत्या करण्यास चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबाबत नीलिमा हिचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिल्या फिर्यादी वरुन गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत नीलिमा हिला होत असलेल्या त्रासाबद्दल पुढील बाबींचा उल्लेख:
“दि. १५ एप्रिल २०२३ ते दि. २९ जुलै २०२३ या मुदतीत, आपली मुलगी दापोली येथील ज्या बँक मध्ये काम करत होती. त्या ठिकाणी असणाऱ्या प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड मुळ रा. कोल्हापुर, याला आपल्या दैनंदिन कामकाजाबाबत रिपोर्टिंग करावे लागत असे. ऑफिसमध्ये तिच्या कामाबाबत मॅनेजर संग्राम गायकवाड याच्याकडून नेहमी १५ दिवसांचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता तिला वारंवार सुट्टीवर असतानादेखील फोन येत असत. आपल्या मुलीस दिवसाला चार ते पाच डी-मॅट खाती उघडण्याकरिता प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड हा जाणून बुजून दबाव आणत असलेबाबत सुट्टीच्या दिवशी दरवेळी आपल्याला व तिचा भाऊ अक्षय यास नीलिमा सांगत असे.
प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव घातला होता. नीलिमाने आपला प्रामाणिक प्रयत्न करून देखील तिला काम जमत नसल्याचे बोलून, कामावरून काढून टाकण्याबाबत धमकी दिली होती व यातूनच ती चिंताग्रस्त झाली होती व घरामध्ये व्यवस्थित जेवत नसले बाबात देखील फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.
सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी अन्वये दाभोळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. नं १७/२०१३ भा.द.वि.सं चे कलम ३०६ अन्वये भा.द.वि. संहिता चे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.