म. टा. प्रतिनिधी, जालना : गेल्या दीड वर्षात जालना पोलिसांनी पावणेआठ क्विंटल गांजा जप्त केला आहे. यातील चौदा गुन्ह्यांमधील गांजा पोलिसांनी जाळून नष्ट केला आहे. अमली पदार्थ नाश समितीने कायदेशीर बाबींची पूर्तता करून हा गांजा नष्ट केल्याची माहिती देण्यात आली. हा सर्व गांजा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जाळून नष्ट करण्यात आला.
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत अमली पदार्थ कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी सात पोलिस ठाण्यातील १४ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमालाचा नाश आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत अमली पदार्थ कायद्याखाली दाखल असलेल्या गुन्ह्यापैकी सात पोलिस ठाण्यातील १४ गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमालाचा नाश आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
जिल्ह्यातील सदरबाजार, कदीम जालना, बदनापूर, मंठा, भोकरदन, परतूर, टेंभुर्णी या पोलिस ठाण्यांत अमली पदार्थ कायदयाखाली दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये गांजा जप्त करण्यात आला होत. हा जप्त करण्यात आलेला गांजा पोलिस मुख्यालय येथील अमली पदार्थांच्या मध्यवर्ती गोडावूनमध्ये जमा करण्यात आला होता. गांजा नष्ट करण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी प्राप्त करून घेऊन जप्त गांजा पोलिस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समिती समोर नष्ट करण्यात आला. सुमारे ५४७ किलो ९५ ग्रॅम गांजा दोन पंचांच्या समक्ष जाळून नष्ट करण्यात आला.