• Sat. Sep 21st, 2024

दीड महिना झाले अजित पवार आले नाहीत; मतदारसंघात एकच चर्चा, …तेव्हाच दादा बारामतीत येणार!

दीड महिना झाले अजित पवार आले नाहीत; मतदारसंघात एकच चर्चा, …तेव्हाच दादा बारामतीत येणार!

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेले आहेत. पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाली. ही बैठक कौटुंबिक असल्याचे अजित पवार आणि शरद पवार यांच्याकडून जाहीर करण्यात आल आहे. असे असले तरी बारामतीमध्ये दीड महिन्यानंतर शरद पवार आले होते. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री होऊनच बारामतीत परतणार असल्याची जोरदार चर्चा आहे. अजित पवार हे त्यांच्या ‘रोखठोक’ स्वभावासाठी ओळखले जातात. पुण्यात झालेल्या बैठकीत त्यांनी गुप्तता पाळत गाडीत लपून गेल्याचे सर्वांनी पाहिले. आता तेच अजित पवार गेल्या दीड महिन्यापासून बारामतीत फिरकले नाहीत, ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊनच बारामतीत येणार असल्याची चर्चा बारामती मतदारसंघात आहे.

राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर दोन्ही ‘पवार’ बारामतीमध्ये फिरकले नाहीत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे काल एक महिन्यानंतर बारामतीमध्ये दाखल झाले. यामुळे बारामतीमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्ते शरद पवार यांना भेटण्यास देखील आले, त्यांनी त्यांच्या समस्या मांडत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे परखड मत व्यक्त केले. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे लाडके नेते अजित पवार हे मात्र अद्यापही बारामतीमध्ये फिरकले नाहीत. बंड केल्यापासून अजित पवार हे बारामतीमध्ये न आल्याने ते मुख्यमंत्री होऊनच बारामतीमध्ये येणार आहेत का? अशी चर्चा सध्या बारामती मतदारसंघात सुरू आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची खुर्ची संकटात होती अस बोलले जात होते. शिंदे- फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सामील होण्याच्या अगोदर अस्वस्थता निर्माण होती. शिंदे यांना पर्याय म्हणूनच अजित पवार यांना सत्तेत सामावून घेतल्याचे बोलले जात आहे. अजित पवार यांचं मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अनेकदा अपूर्ण राहिलेला आहे. त्यामुळे काही महिने का होईना अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. राष्ट्रवादीत बंड करून ते शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळेच बारामतीमध्ये ते मुख्यमंत्री होऊनच परतणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed