मात्र नागपूरच्या एका दृष्टीहीन चिमुकलीने स्वातंत्र्य दिवस अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे. ईश्वरी पांडे असे या १३ वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. देशावर असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आज ईश्वरीने अंबाझरी तलावात तब्बल अडीच किलोमीटर अंतर पोहत तलावाच्या मध्यभागी ध्वजारोहण करण्याची कामगिरी केली आहे. तब्बल अडीच किमी पोहून ईश्वरीने अंबाझरी तलावाच्या अगदी मध्यभागी ध्वजारोहण केले आहे. गेल्या चार वर्षापासून ईश्वरी हे कामगिरी सातत्याने बजावत आहे. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी नागपुरातील दृष्टी नसलेल्या व्यक्तीने तलावाच्या इतक्या आत जाण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही.
ज्यांनी आपला देश कधीही आपल्या डोळ्यांनी बघितलाच नाही. त्यांच्यासाठी आजच्या ऐतिहासिक दिवसाचे महत्व किती असेल याचे उत्तर पांडे हिन तिच्या कृतीतून दिले आहे. जगातील डोळस व्यक्तींना जे जमलं नाही ते या चिमुकलीने करून दाखवलं आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ईश्वरीने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली आहे. ज्यावेळी ती परत आली तेव्हा तलावावर उपस्थित असलेल्या प्रत्येकाने ईश्वरीचे टाळ्या वाजवून स्वागत केले. देशभक्ती आणि अनोखे ध्वजारोहण पाहण्यासाठी लोक या अंबाझरी तलावावर मोठ्या उत्साहाने येतात. नागपूरच्या अंबाझरी तलावात झेंडा घेऊन पोहणारी माणसे नागपूरकर आहेत. दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला या तलावाच्या मध्यभागी पोहून तेथे ध्वज फडकवतात. सुमारे पाचशे मीटर अंतर पोहल्यानंतर पाण्याच्या वर एक ध्वज फडकवला जातो. दरवर्षी नवीन नवीन लोक यात भाग घेतात.
हा उपक्रम गेल्या ३० वर्षापासून सातत्याने सुरू असुन दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवसाला साजरा करण्यात येतो. जलतरणपटूंमध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होऊन जागतिक स्तरावरील खेळाडू तयार व्हावे आणि भारत देशाचे नाव जागतिक स्तरावर झळकावे यासाठी अनोखी संकल्पना राबविण्यात येत असल्याचे मत जलतरणपटूंनी बोलतांना व्यक्त केले. मात्र ती व्यक्त करण्याची पद्धत सर्वांचीच वेगळी असते. असाच आगळा वेगळा ध्वजारोहणाचा कार्यक्रम नागपुरात बघायला मिळाला आहे. नागपूर शहरातील सर्वात मोठा तलाव अशी ओळख असलेल्या अंबाझरी तलावाच्या मध्यभागी अंबाझरी संरक्षण आणि संवर्धन संस्थेच्या जलतरणपटूंनी तलावातील ७० फूट खोल मध्यवर्ती भागात पोहून ध्वजारोहण केले आहे. तलावातच एकसाथ राष्ट्रगीत गाऊन अनोख्या पद्धतीने स्वतंत्र दिन साजरा केला आहे. विशेषत: या उपक्रमात दृष्टीहीन आणि दिव्यांग जलतरणपटूंचा देखील समावेश होता.