• Mon. Mar 9th, 2026
    बाथरुममध्ये सिगरेटची 18 थोटकं, खिशात मराठी चिठ्ठी, डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणाचं गूढ कायम

    Dr Shirish Valsangkar Death Case : प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी राहत्या घरी गोळी झाडून आयुष्य संपवलं होतं

    डॉ शिरीष वळसंगकर(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर : प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी जीव दिल्याच्या प्रकरणात नवनवीन ट्विस्ट येत आहेत. डॉ वळसंगकर यांच्यासह अन्य साक्षीदारांच्या सीडीआर व टॉवर लोकेशनच्या सीडीच्या प्रती सोमवारी आरोपी पक्षाला न्यायालयात मिळण्याची शक्यता आहे. डॉ. वळसंगकर प्रकरणात सरकार पक्षाने डॉ. शिरीष, त्यांचे पुत्र डॉ. अश्विन वळसंगकर व इतर साक्षीदारांचे सीडीआर व टॉवर लोकेशन याची माहिती बंद लिफाफ्यात सीडीच्या माध्यमातून न्यायालयात दाखल केली आहे.

    सीडीआर व टॉवर लोकेशनच्या सीडीच्या प्रती आरोपीस मिळाव्यात यासाठी मागील तारखेस आरोपी मनीषा मुसळे माने यांचे वकील ऍड प्रशांत नवगिरे यांनी कोर्टात मागणी केली होती. हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी मंजूर करत सीडीच्या प्रती देण्याचा आदेश सरकार पक्षास दिला होता.

    नेमके कारण दहा महिन्यानंतरही गुलदस्त्यातच

    मोबाईल लोकेशनच्या सीडीच्या प्रती सोमवारी मिळण्याची अपेक्षा आहे. यापूर्वीच साक्षीदार पी. राऊत व आर. राऊत यांचे मोबाइल सीडीआर व टॉवर लोकेशन याची कागदपत्रे व माहिती आरोपी पक्षाला देण्यात आली आहे.

    Sunetra Pawar : आज अजितदादांची प्रकर्षानं आठवण येतेय, भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक

    प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गोळी झाडून आयुष्य संपवलं होतं. १० महिन्यानंतरही त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेलं नाही.
    Maharashtra TimesCrime News : स्वतःला वाचवताना टॅक्सी चालकाचा जीव घेतला, बॉडी पुण्यात टाकली; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला टिटवाळ्यात अटक

    पाच दिवस आधी एका नंबरवरून वारंवार संभाषण

    १३ एप्रिल २०२५ रोजी ४ वेळा व १५ एप्रिल रोजी ८ वेळा डॉ. शिरीष व अन्य एका मोबाइल नंबर यांच्यात संभाषण झाल्याचे मोबाइल सीडीआरमध्ये दिसून आले आहे. १८ एप्रिल २०२५ रोजी दवाखान्यातून घरी आलेले डॉक्टर वळसंगकर खूप वेळ सोलापुरातील घरामधील बेडरुममध्ये एकटेच होते. पंचनामा करताना त्यांच्या बाथरूममध्ये सिगारेटची १८ थोटके पोलिसांना आढळली होती. ज्या पिस्टलमधून डॉक्टरांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या, ती बंदुक त्यांच्या बेडरुममधील कपाटातून जप्त केल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात नमूद आहे.
    Maharashtra TimesNashik Crime : डॉ. मनीषा जेजुरकरांनी जीव दिला, मानसोपचार तज्ज्ञ नवऱ्यावर गुन्हा, डॉक्टर महिलेशी जवळीक असल्याचा आरोप

    मराठीतून शेवटची चिठ्ठी, मनीषा मुसळे मानेवर गुन्हा

    डॉ वळसंगकर यांनी जीव दिल्यानंतर पोलीस तपास करताना त्यांच्या खिशात मराठीतून लिहिलेली शेवटची नोट सापडली. त्यावरुन डॉ. शिरीष यांचे चिरंजीव डॉ. अश्विन यांनी पोलिसांत फिर्याद दिली. रुग्णालयाच्या कर्मचारी मनीषा मुसळे माने यांना सदर बझार पोलिसांनी अटक केली होती. गुन्ह्याचा तपास करून तब्बल ७२० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा